Kangana Ranaut Social Media Post: ‘आमिर माझाही चांगला मित्र होता पण...’ कंगनाने हृतिकचं नाव घेत केली खरमरीत टीका

Kangana Ranaut - Aamir Khan Friendship: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. कंगना आणि हृतिकचे वाद अनेकदा सोशल मीडियावर सर्वांनीच पाहिला आहे.
Kangana Ranaut Social Media Post
Kangana Ranaut Social Media PostSaam Tv

Kangana Ranaut Social Media Post: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. कंगना आणि हृतिकचे वाद अनेकदा सोशल मीडियावर सर्वांनीच पाहिला आहे. अनेकदा कंगना बॉलिवूड सेलिब्रिटींवर ट्वीटरच्या माध्यमातून सडकून टीका करते. आता पुन्हा एका नव्या कलाकारावर तिने जबरदस्त टीका केली आहे. कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून अमिरवर व्हिडीओ पोस्ट करत निशाणा साधला.

Kangana Ranaut Social Media Post
Yo Yo Honey Singh: ‘लुंगी डान्स’ शाहरूखला आवडला नाही?; खुद्द हनी सिंगनेच केला सर्वात मोठा खुलासा...

हा व्हिडीओ शेअर करत कंगनाने लिहिलं, ‘खरंतर मलाही कधी कधी ते दिवस आठवतात जेव्हा आमिर सर माझे चांगले मित्र होते. काय माहित ते जुने दिवस कुठे गेलेत?’ हृतिकसोबतच्या काही कायदेशीर बाबींचा उल्लेख करत कंगना म्हणते, ‘एक गोष्ट नक्की आहे की आमिरने मला मार्गदर्शन केलं, माझं कौतुक केलं आणि मला एक योग्य दिशा दाखवली. पण हृतिकने माझ्याविरोधात खटला दाखल केल्यानंतर त्याने त्याचा वेगळा मार्ग निवडला. त्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीविरोधात एक महिला असा लढा सुरू झाला’ असं तिने म्हटलंय.

Kangana Ranaut Social Media Post
Kangana Ranaut Social Media Post Instagram

कंगना आणि हृतिकमधला वाद

कंगानाचा आणि हृतिकमध्ये २०१६ मध्ये काही कारणांवरून शाब्दिक वाद झाला होता, त्यावरून हृतिकने कंगनाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या दोघांनीही ‘क्रिश’ चित्रपटात एकत्र काम केले होते. कंगनाने हृतिकचा ‘Silly Ex’ असा एका मुलाखतीत असा उल्लेख केला होता, त्यामुळे हृतिकने तिच्याविरोधात कायदेशीर नोटीस पाठवली.

Kangana Ranaut Social Media Post
Saeeda Imtiaz: पाकिस्तानी अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; राहत्या घरात आढळला मृतदेह...

सर्वात पहिले सोशल मीडियावर हृतिकने कंगनासोबत कोणतेही प्रेमसंबंध नसल्याचा खुलासा केला होता. कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवत माफी मागण्याची मागणी केली. त्या मुद्द्यावर कंगनाने माफी मागण्यासाठी साफ नकार दर्शवला. २०१४ मध्ये त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा ही तिने दावा केला होता. कंगनाने ह्रतिकला नोटीस पाठवली आणि आपण पाठवलेली नोटीस मागे घे किंवा फौजदारी खटल्याला सामोरे जा असा इशारा दिला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com