Tiger 3 Set Video Leaked: अखेर दिसलेच..! ‘टायगर ३’ च्या शुटींगसाठी 'पठान' आणि 'टायगर' एकत्र; व्हिडीओ होतोय व्हायरल

Tiger 3 Set Video Viral: सध्या सोशल मीडियावर ‘टायगर ३’ च्या सेटवरील काही फोटो व्हायरल होत आहेत. शाहरुख खान आणि सलमान खान पुन्हा एकदा एकत्र दिसले.
Salman And Shah Rukh Shooting Video Leaked
Salman And Shah Rukh Shooting Video LeakedSaam TV

Salman And Shah Rukh Shooting Video Leaked: गेल्या अनेक दिवसांपासून ‘टायगर ३’ च्या शूटिंगमधील अपडेट चाहत्यांना वारंवार येत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची कमालीची उत्सुकता वाढली आहे. चित्रपट येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारतासह परदेशात चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर शूटिंग दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून शाहरुख खान आणि सलमान खान पुन्हा एकदा एकत्र दिसले.

Salman And Shah Rukh Shooting Video Leaked
Tejashri Pradhaan News: काय सांगता..! तेजश्रीच्या डोक्यावर अक्षता पडणार.. शुभमंगल होणार..

सलमान खानच्या ‘टायगर ३’ ची चाहत्यांना आतुरता आहे. खासकरुन ‘पठान’ नंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. शाहरूखच्या ‘पठान’मध्ये दोघेही एकत्र दिसल्यानंतर ‘टायगर ३’मध्येही ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. शाहरुखच्या ‘पठान’ मध्ये सलमान ने पाहुणा कलाकार म्हणून एन्ट्री घेतली होती. तर आता शाहरुख खान सलमानच्या ‘टायगर ३’ मध्ये एन्ट्री घेणार आहे. हे दोघेही एकत्र दिसण्याची पर्वणी प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. याआधी या दोघांनी 'करण अर्जुन' या चित्रपटात एकत्र दिसले होते. हा चित्रपट अजुनही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ‘टायगर ३’च्या माध्यमातून ही जोडी एकत्र दिसणार आहे.

किंग खानची ग्रॅंन्ड एन्ट्री

सध्या सोशल मिडियावर शाहरुख खान आणि सलमानचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यात हे दोघेही एकाच सेटवर दिसत आहेत. सोशल मीडियावर ‘टायगर ३’ ची चर्चा त्याच्या घोषणेपासूनच होत आहे. सलमानसोबत चित्रपटात कतरिना कैफ दिसत असून शाहरूख पाहुणा कलाकार आहे. सध्या या दोघांचाही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Salman And Shah Rukh Shooting Video Leaked
Salman Khan and Kareena Kapoor: करिनाने बाथरुममध्ये लावले होते सलमानचे फोटो, पण एक दिवशी अचानक फाडून टाकले, कारण..

दिवाळीच्या मुहुर्तावर 'टायगर ३' चाहत्यांच्या भेटीला

सलमान खान आणि कैतरिना कैफ यांचा ‘टायगर ३’ हा नवीन चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट हिंदीसह तमिळ व तेलगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित केलेला हा बिगबजेट चित्रपट आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०१२ ला रिलीज झाला होता. पहिल्या भागाचे नाव 'एक था टायगर', तर दुसरा भाग म्हणजे 'टायगर जिंदा है'. हा चित्रपट २०१७ मध्ये रिलीज झाला होता. तर टायगर ३ हा तिसरा भाग आहे. येत्या दिवाळीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच दिग्दर्शन मनीष शर्माने केले असून चित्रपटाचं बजेट ३०० कोटी इतकं असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.

Edited By- Siddhi Hande

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com