Salman Khan Bodyguard Shera News: सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या आईसोबत असभ्य वर्तन, पोलिसांत FIR दाखल

Salman Khan Bodyguard Shera: सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या आईसोबत सोसायटीतल्या एका सदस्याने शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे.
Salman Khan Bodyguard Shera Filed Complained Against Society Member
Salman Khan Bodyguard Shera Filed Complained Against Society MemberSaam Tv

Salman Khan Bodyguard Shera Filed Complained Against Society Member

सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सलमानचा बॉडीगार्ड शेराच्या आईसोबत राहत असलेल्या सोसायटीतील काही सदस्यांनी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना घडल्यानंतर शेराने सोसायटीतल्या एका सदस्याविरोधात अंधेरीतल्या डी.एन. नगर पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Salman Khan Bodyguard Shera Filed Complained Against Society Member
Dalip Tahil: 'बाजीगर' फेम दलीप ताहिल यांना २ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

सोसायटीचे सदस्य जयंतीलाल पटेल यांनी शेराच्या आईची बदनामी करत असून असभ्य भाषा वापरत आहेत, असा शेराची आई प्रीतम कौर जॉली यांनी आरोप केला आहे. शेरा आणि त्याचे कुटुंबीय मुंबईतल्या मनीष नगरमध्ये असलेल्या इमारतीत गेल्या ५० वर्षांपासून राहत आहेत. २०२१मध्ये या सोसायटीच्या अध्यक्षपदावर प्रीतम कौर आणि सचिवपदावर जयंतीलाल होत्या. दोघांमध्ये काही प्रमाणात शाब्दिक वाद झाल्यामुळे हा वाद झाला.

ETimes सोबत बोलताना शेराने सांगितले की, “आम्ही गेल्या ५० वर्षांपासून आशिष को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये राहत आहोत. माझे आई- वडील माझ्या मुलासोबत या सोसायटीमध्ये राहायचे, तर काही वर्ष मी ओशिवरा येथे राहत होतो. माझी आई या सोसायटीची अध्यक्ष तर जयंतीलाल सोसायटीचे सचिव होते. २०१६ मध्ये इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. जयंतीलाल म्हणाले होते की, ६० लाख रुपयांमध्ये काम संपूर्ण होईल. पण सचिव ठरवलेल्या बजेटमध्ये बिल्डिंगीचं काम पूर्ण करू शकले नाहीत. त्यानंतर माझ्या आईने २०२१ मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.”

Salman Khan Bodyguard Shera Filed Complained Against Society Member
Kangana Ranaut Flirt With Salman Khan: ‘तेजस’च्या प्रमोशनसाठी पंगा गर्ल 'बिग बॉस'च्या घरात, होस्ट कंगनाला पाहून सर्वच झाले अचंबित...

शेराने पुढे सांगितले की, “सचिव जयंतीलाल यांनी माझ्या आईविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यांनी माझ्या आईची बदनामी करण्यासाठी सुरुवात केली. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सेक्रेटरीने माझ्या आईबद्दल अपशब्द वापरले. सेक्रेटरीने शेराच्या आईला शिवीगाळही केली होती. त्यानंतर आम्ही डी.एन.नगर पोलिस ठाण्यामध्ये कलम ५०९ आणि ५०० अंतर्गत तक्रार दाखल केली.”

Salman Khan Bodyguard Shera Filed Complained Against Society Member
Parineeti Chopra Birthday: बँकेत नोकरी करणारी परिणीती चोप्रा अशी बनली बॉलिवूड अभिनेत्री, वजन कमी करण्यासाठी केला १० लाखांचा खर्च

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com