Khatron Ke Khiladi 13 मधील स्पर्धकांची केपटाऊनमध्ये धमाल मस्ती; शिवसह ऐश्वर्याने केले फोटो शेअर...

लवकरच या शोच्या सीझनच्या १३ व्या सीझनला सुरूवात होणार असून सर्व स्पर्धक केपटाऊनला रवाना झालेत.
Khatron Ke Khiladi 13 Contestants Funny Moments
Khatron Ke Khiladi 13 Contestants Funny MomentsInstagram

Khatron Ke Khiladi 13 Contestants Funny Moments: ‘खतरों के खिलाडी सीजन 13’ ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. लवकरच या शोच्या सीझनच्या १३ व्या सीझनला सुरूवात होणार असून सर्व स्पर्धक केपटाऊनला रवाना झालेत. या शोचे होस्टिंग बॉलिवूड चित्रपट निर्माता रोहित शेट्टी करणार आहे. शोचे शूटिंग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. जवळपास सर्वच स्पर्धक परदेशात पोहोचले असून ते परदेशात चांगलीच धमाल- मस्ती करत आहे.

Khatron Ke Khiladi 13 Contestants Funny Moments
Parineeti Raghav Engagement: परिणीती-राघव चड्डाचा झाला साखरपुडा! दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले फोटोज

नुकतेच ‘खतरों के खिलाडी सीजन 13’मधील सर्वाधिक महागडा स्पर्धक आणि नेहमीच चर्चेत राहणारा स्पर्धक शिव ठाकरेने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याच्यासोबत शोमधील एक स्पर्धकासोबत मस्ती करताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरात या शोची शूटिंग होणार आहे. फोटोत सर्वच स्पर्धक मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. लवकरच येत्या काही दिवसात शूटिंगला सुरूवात होणार असून सध्या त्यांची केपटाऊन शहरात कमालीची धमाल मस्ती दिसून येत आहे.

शिव ठाकरेबद्दल बोलायचे तर, तो जिथे जातो तिथे आपली मस्ती करणं तो काही सोडत नाही, पण दक्षिण आफ्रिकेतही काही वेगळं नाही. केपटाऊनमध्ये आल्यानंतर, शिवने परदेशातील अनेक फोटो, तिथली धमाल मस्ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. सर्व स्पर्धक मजा करताना दिसत असून शिव एका परदेशी महिलेसोबत फ्लर्टिंग करताना दिसत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, शिव एका परदेशी महिलेसोबत धमाल करताना दिसत असून शाहरूखच्या सिग्नेचर स्टेपने तिला प्रभावित करण्याचं काम करतोय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Khatron Ke Khiladi 13 Contestants Funny Moments
Upendra Limaye: जबरी बोलणं अन् खतरनाक अभिनय... उपेंद्र लिमये साकारणार ‘नवी’ भूमिका

अंजुम फकीहने ‘खतरों के खिलाडी सीजन 13’ च्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये ती सहज उभी दिसत असून तिच्या स्टाईलने सर्वांचेच लक्ष वेधले. सोबतच, ऐश्वर्या शर्माने ‘खतरों के खिलाडी सीजन 13’ च्या सेटवरील सर्व स्पर्धकांसोबतचा एक ग्रुप फोटोही शेअर केला असून सर्वच स्पर्धक स्टंटसाठी तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर रुही चतुर्वेदीने देखील शिव ठाकरेसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही केपटाऊनमधील एका मैदानात उभे आहेत आणि एकत्र स्टायलिश पोज दिली आहे.

Khatron Ke Khiladi 13 Contestants Funny Moments
Abdu Rozik In Gun Controversy: बिग बॉस फेम अब्दू अडचणीत; पोलिसांत तक्रार दाखल, काय आहे प्रकरण?

नुकतेच अनेक स्पर्धक ‘खतरों के खिलाडी सीजन 13’च्या शूटिंगसाठी परदेशात रवाना झाले. यावेळी शिवचे कुटुंबीय त्याला भेटायला आले होते. यावेळी शिवच्या चाहत्यांनी त्याला या रिॲलिटी शोसाठी शुभेच्छा देताना दिसले आणि त्याला अनेक भेटवस्तू देताना ही दिसले. शिवसोबतच या सीझनमध्ये ऐश्वर्या शर्मा, अंजली आनंद, डेझी शाह, अंजुम फकीह, डिनो जेम्स, रुही चतुर्वेदी यांसारखी लोकप्रिय चेहरे पाहायला मिळणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com