Sulochana Latkar Hospitalize: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची प्रकृती चिंताजनक, रूग्णालयात दाखल...

Sulochana Latkar Health Update: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Sulochana Latkar Hospitalize
Sulochana Latkar HospitalizeSaam Tv

Sulochana Latkar Admited In Mumbai: पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळत आहे. त्यांना मुंबईतील सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

Sulochana Latkar Hospitalize
Sunny Leone's Maldives : चक्क कलिंगडाच्या रंगाची बिकिनी घालून सनी लियोनीचा समुद्रात जलवा; व्हिडिओ व्हायरल

सुलोचना लाटकर यांना काही दिवसांपुर्वी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांना श्वसनाशी संबंधित आजाराने ग्रासल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी योग्य उपचारानंतर त्या घरी बऱ्या होऊन परतल्या होत्या. मात्र आज अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. यातच सुलोचना लाटकर यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आल्यानंतर, त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेच वातावरण आहे. त्यांचे अनेक चाहते सोशल मीडियावर त्यांची तब्येत बरी व्हावी या पोस्ट शेअर करत आहे.

Sulochana Latkar Hospitalize
Shah Rukh Visit Set Visit To Aryan Khan’s Web Series: आर्यनच्या शूटिंगला शाहरूखची हजेरी, किंग खानने लेकाला दिले खास सरप्राईज...

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी आपल्या व्यावसायिक आयुष्यात अनेक चित्रपट प्रेक्षकांना दिले. त्यांनी मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. सुलोचना यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला असून त्यांनी सिनेसृष्टीत १९४३ मध्ये पदार्पण केले. आपल्या सोज्वळ दिसण्यानं आणि सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आधिराज्य गाजवलं. (Marathi film)

आजही सुलोचना लाटकर यांच्याबद्दल चाहत्यांच्या मनात सोज्वळ, शांत आई अशी प्रतिमा कायम आहे. अनेक मराठी चित्रपटांमध्ये सुलोचना यांनी अनेक घरंदाज भूमिका साकारल्या आहेत. सुलोचनादीदींनी २५०हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांचे अनेक चित्रपट अनेक थिएटरमध्ये फारच गाजले आहेत. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com