बीडमध्ये मुक्या जनावरांमध्ये साथीच्या आजाराचे संकट; 40 जनावरांचा मृत्यू..!

बीड
बीड

बीड - बीडच्या Beed आष्टी Ashti तालुक्यात मुक्या जनावरांमध्ये Animals घटसर्प, थायरेलेलीस सदृश्य साथीच्या Communicable आजाराने Disease थैमान घातलंय. या आजारामुळं शासकीय आकड्यानुसार 40 जनावरांचा मृत्यू Death झाला आहे.Epidemic Crisis In Domestic Animals In Beed 40 Animals Die

मात्र गाव पातळीवर हा आकडा मोठा असून आतापर्यंत 100 च्या वर जनावरांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. तर आधीच लोकांचं कोरोनाच्या Corona संकटानं Crisis जगणं मुश्किल झालं असतांना आता ऐन सुगीचे दिवस सुरू होण्यापूर्वी, मुक्या जनावरांवर संकट ओढावल्यानं, शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. लाख मोलाची दुभती जनावरं मरू लागल्यानं शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट ओढावलं आहे.

आष्टी तालुक्यातील तवलवाडी वाळुंज परिसरात 60 दुभत्या गाई व 40 वासरं मृत्यूमुखी पडली आहेत. मात्र शासन Government दप्तरी हा आकडा चाळीसच आहे. साथीच्या आजाराची लक्षणे दिसून आल्यानंतर काही वेळातच गाईंचे मृत्यु होत आहेत. Epidemic Crisis In Domestic Animals In Beed 40 Animals Die

यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर यासंदर्भात औरंगाबाद विभागीय पशू संवर्धन विभागाची टीम आष्टीत दाखल झाली आहे. मृत गायींचं शवविच्छेदन करून शरीरातील काही भागांचे नमुने भोपळच्या प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुरेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे.

तवलवाडी, वाळुंज परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतकरी मुक्त गायगोठा पद्धतीनं आधुनिक दुग्धव्यवसाय करतात. गेल्या पाच सहा दिवसांपासून तवलवाडी परिसरात घटसर्प, थायरेलेलीस या साथीच्या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. Epidemic Crisis In Domestic Animals In Beed 40 Animals Die

यामुळं गेल्या 4 ते 5 दिवसांत तब्बल 60 संकरीत गाई आणि 40 च्या आसपास वासरं घटसर्प सदृश्य आजारानं दगावली आहेत. गाईंच्या मृत्यूमागचं नेमकं कारण शोधलं जात आहे. आधीच दुधाच्या घसरलेल्या दराने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यात लॉकडाऊनच्या परिस्थितीत कोरोना महामारीच्या काळामध्ये शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा संकट घोगावत आहे.

त्यात आता ऐन सुगीच्या दिवसापूर्वी जनावरांमध्ये आलेल्या या साथीच्या आजाराने शेतकरी मेटाकुटीला आलाय.यामुळं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांतुन केली जात आहे.

Edited By : Krushanrav Sathe 

हे देखील पहा -

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com