कमलनाथ यांना मोठा दिलासा, आजची अग्निपरीक्षा टळली

कमलनाथ यांना मोठा दिलासा, आजची अग्निपरीक्षा टळली

मध्य प्रदेश - मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांची आजची अग्निपरीक्षा टळलीय आहे. विधानसभा अधयक्षांची विधानसभेचं कामकाज 26 मार्चपर्यंत स्थगित केल्यामुळे कमलनाथ यांची अग्निपरीक्षा टळलीय. मध्य प्रदेशातील सर्वच आमदारांनी विधानसभेत हजेरी लावली. यावेळी मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टण्डन यांनीही विशेष उपस्थिती लावली. आणि सर्व कामकाज नियमांनुसारच झालं पाहिजे अशा सूचना राज्यपालांनी केल्या आणि ते विधानसभेतून निघून गेले. यानंतर काहीवेळातच विधानसभेचं कामकाज 26 तारखेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यामुळे मध्य प्रदेश सरकारची बहुमत चाचणी लांबणीवर पडलीय. 

ज्योतिरादित्य शिंदे समर्थक 22 आमदारांनीही राजीनामे दिल्याने काठावर बहुमत असलेले काँग्रेस सरकार अडचणीत आले आहे. या बावीस आमदारांमध्ये सहा मंत्र्यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपवर घोडेबाजार करत असल्याचा आरोप करत विश्‍वासदर्शक ठरावासाठी तयार असल्याचे आव्हान दिले होते. या पार्श्‍वभूमीवर, राज्यपालांनी काल रात्री मुख्यमंत्री कमलनाथांना पत्र पाठवत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं.

महत्त्वाचं म्हणजे अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या एक दिवस आधी जयपूर येथे असलेले काँग्रेसचे आमदार भोपाळमध्ये परतले होते. काँग्रेसने सर्व आमदारांना हजर राहण्यासाठी व्हिप जारी केला होता.  भाजपनेही आपल्या आमदारांना व्हिप जारी केला होता. अखेर आज विधानसभेचं कामकाज 26 तारखेपर्यंत तहकूब करण्यात आल्यानं कमलनाथ यांना मोठा दिलासा तर मिळालाच. आणि त्यांची आजची होणारी अग्निपरीक्षादेखील टळली आहे. 

काँग्रेसचे निष्ठवंत म्हणून, ज्योतिरादित्य शिंदे यांची ओळख होती. पण, मुख्यमंत्री कलमनाथ आणि ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांच्यात असलेले मतभेद टोकाला गेल्यामुळं अखेर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही आठवड्यांपासून ही खद् खद सुरू होती. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे 11 आमदार बेपत्ता झाल्याची चर्चा होती. पण, त्यातील नऊ आमदार टप्प्या टप्प्याने माघारी आले. 

kamalnath relief till 26th march marathi madhya pradesh congress bjp rahul gandhi sonia gandhi politics india

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com