Acidity Tablets Side Effects : सावधान! अॅसिडिटी झाल्यावर औषधे खाऊन होऊ शकतो किडनीला धोका? जाणून घ्या तज्ञांचे मत

Acidity Tablets : अनेक जण काही खातात आणि पितात तेव्हा त्यांना अॅसिडिटीचा त्रास होऊ लागतो.
Acidity Tablets Side Effects
Acidity Tablets Side EffectsSaam Tv

Side Effects Of Acidity Tablets : अनेक जण काही खातात आणि पितात तेव्हा त्यांना अॅसिडिटीचा त्रास होऊ लागतो. यामुळे पोटात अनेक समस्या उद्भवू शकतात. यामध्ये अल्सर, जठरासंबंधी जळजळ, छातीत जळजळ आणि अपचन यांचा समावेश होतो.

अनियमित खाणे, शारीरिक हालचालींचा अभाव, दारू-सिगारेट पिणे, टेन्शन, चरबीयुक्त आहार (Diet), पोटात गाठी, गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज, पेप्टिक अल्सर अशा समस्यांमुळे अनेकदा या समस्या उद्भवतात. काही लोक त्यामध्ये आम्लता असलेली औषधे खातात, जे धोकादायक असू शकतात.

Acidity Tablets Side Effects
Home Remedies For Acidity: उन्हाळ्यात मसाल्याचे व तळलेले पदार्थ खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी होते ? हे डिंक प्या, त्वरित मिळेल आराम

ऍसिडिक औषधे टाळा -

काही लोक अॅसिडिटी टाळण्यासाठी औषधे (Medicine) घेण्यास सुरुवात करतात. ही औषधे काही दिवसांसाठी फायदेशीर ठरू शकतात, पण ती घेणे बंद करताच पुन्हा अॅसिडिटीची समस्या सुरू होते. मग ही औषधे घेण्याची सवय होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अॅसिडिक औषधे जास्तीत जास्त 4 आठवडे सेवन करता येतात. ही औषधे जास्त प्रमाणात घेतल्याने किडनी खराब होऊ शकते.

ऍसिडिटीची औषधे घेतल्याने होणारे दुष्परिणाम -

1. गॅससाठी अधिक औषधे तुमच्या स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम करू शकतात. या औषधांच्या अतिसेवनाने स्मृतिभ्रंशाची समस्या वाढू शकते. ही औषधे तुम्ही दीर्घकाळ घेतल्यास स्मृतिभ्रंश होऊ शकतो.

2. एका संशोधनानुसार, सतत पोटाच्या औषधांचा वापर केल्याने पोटात बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

3. अ‍ॅसिडिटीच्या औषधांच्या जास्त सेवनाने रक्तावर परिणाम (Effect) होऊ शकतो. त्यामुळे मॅग्नेशियमची कमतरता होण्याचा धोका असतो आणि किडनीचे आरोग्यही बिघडू शकते.

Acidity Tablets Side Effects
How To Cure Acidity At Home Instantly: यंदाच्या होळीत खा खा खाल्ल ? अॅसिडिटीचा त्रास होतोय ? घरगुती हाच एकमेव उपाय

ऍसिडिटीच्या समस्येपासून कशी सुटका मिळेल -

1. जर तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारात बदल करा.

2. आहारात मसालेदार आणि तळलेले तळलेले पदार्थ खाऊ नका.

3. शक्यतो तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

4. जेवणात दूध, मसालेदार पदार्थ आणि मटण यांपासून अंतर ठेवा.

5. रोज चाला आणि व्यायाम करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com