
Chest Pain Relief : कधी कधी असे होते की, काही खाल्ल्यानंतर आपल्या अॅसिडीटी किंवा अपचनाचा त्रास होतो. त्यामुळे आपल्या छातीत दुखू लागते. या दुखण्याला आपण हार्ट अटॅक समजतो. पण छातीत दुखण्याचे इतर अनेक कारणही असू शकतात.
बदलेली जीवनशैली व खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बरेचदा आपल्या छातीत जळजळ (Acidity), जडपणा, छातीत दाब यांसारख्या समस्या उद्भवतात. जर तुमच्या छातीत दुखत असेल तर हे घरगुती उपाय (Home Remedies) करा किंवा त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या
1. कोरफडचा ज्यूस
कोरफड हे जितके त्वचेसाठी फायदेशीर (Benefits) आहे तितकेच ते शरीराच्या इतर आजारांवर देखील रामबाण आहे. कोरफडचा ज्यूस प्यायल्याने हृदय निरोगी राहते. ते नियमितपणे प्यायल्याने चांगले कोलेस्ट्रॉल तयार होण्यास मदत होते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार टाळता येतात. उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे. हा रस छातीत दुखणे दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. कोरफडीचा रस दिवसातून १ ते २ वेळा प्यावा.
2. गवती चहा
पोट फुगणे किंवा अपचनामुळे तुम्हाला छातीत दुखत असेल तर हर्बल टी नक्की घ्या. यामुळे छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी, पचन व हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी चांगले आहे.
3. तुळस
तुळशीमध्ये व्हिटॅमिन-के आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. छातीत दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही 8-10 तुळशीची पाने चावू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुळशीचा चहा पिऊ शकता.
4. आलं
छातीतील वेदना कमी करण्यासाठी आलं खूप प्रभावी आहे. यासाठी तुम्ही आल्याच्या चहा किंवा रस पिऊ शकता. ते बनवण्यासाठी आल्याची पेस्ट तयार करा आणि या पाण्यात टाकून उकळा. हे पेय कोमट झाल्यावर प्या.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.