Heatwave Precaution : उन्हाळ्यात बाहेरुन घरी आल्यानंतर करु नका या चुका, अन्यथा होतील गंभीर आजार

Health Tips In Summer : भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेने लोक हैराण झाले आहेत.
Heatwave Precaution
Heatwave PrecautionSaam Tv

Precaution Of Heatwave : उष्णतेमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कडक ऊन आणि कडक उन्हामुळे सर्वांचीच अवस्था बिकट झाली आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेने लोक हैराण झाले आहेत. उन्हाळ्याच्या हंगामात, उष्माघात आणि कडक सूर्यप्रकाशापासून स्वतःचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे.

हिट स्ट्रोकमुळे अनेकदा अनेक समस्यांना (Problems) सामोरे जावे लागते. याशिवाय आपल्या काही सवयी देखील उन्हाळ्यात आजारी पडण्याचे एक मोठे कारण बनतात. तुमच्या काही सवयी बदलून तुम्ही या ऋतूत निरोगी राहू शकता.

अशाच काही सवयींबद्दल जाणून घेऊयात, ज्याचा तुमच्या आरोग्यावर (Health) वाईट परिणाम होऊ शकतो. तुम्हालाही यापैकी काही सवयी असतील तर लवकरात लवकर सुधारा, अन्यथा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Heatwave Precaution
Heatwave Life Saving Tips : उष्णतेच्या लाटेत स्वतःचे संरक्षण कसे करावे? या टिप्स फॉलो करा आणि जीव वाचवा...

उन्हातून येणे आणि रेफ्रिजरेटरचे थंड पाणी पिणे -

उन्हातून घरी परतल्यावर अनेकदा तहान लागते. अशा वेळी लोक तहान घालवण्यासाठी थंड पाणी पितात. पण उन्हातून आल्यानंतर लगेच फ्रीजमधलं थंड पाणी प्यायलं तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. म्हणूनच शरीराचे तापमान खोलीच्या तापमानाइतके होण्याची प्रतीक्षा करणे चांगले आहे आणि थंड पाण्याऐवजी काही वेळाने साधे पाणी प्या.

फास्ट फूड टाळा -

कडक उन्हातून परत आल्यानंतर अनेकदा भूक लागल्याने लोक लगेच अन्न खातात. पण यामुळे तुम्हाला अनेकवेळा डायरियाची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही उन्हातून आला असाल तर अर्ध्या तासानंतरच काहीतरी खा. तसेच फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खाणे टाळावे.

Heatwave Precaution
Increased Risk of Heat Waves : वाढत्या उष्णतेच्या लाटांचा धोका अधिक ! तज्ज्ञांनी दिला इशारा, कशी घ्याल काळजी ?

उन्हातून परतल्यावर लगेच आंघोळ करण्याची चूक -

उन्हामुळे लोक (People) घामाने भिजतात. अशा परिस्थितीत काही लोक घरी येताच घाम काढण्यासाठी लगेच आंघोळीला जातात, पण तुमची ही सवय तुम्हाला आजारी बनवू शकते. वास्तविक बाहेरून आल्याने शरीराचे तापमान वाढते, अशा परिस्थितीत थंड पाण्यामुळे शरीराचे तापमान बिघडते, ज्यामुळे सर्दी आणि फ्लू होऊ शकतो.

उन्हातून आल्यावर लगेच एसीमध्ये बसू नका -

कडाक्याच्या उन्हातून घरी परतल्यानंतर अनेकजण एसीमध्ये बसतात. एसीच्या थंड हवेने तुम्हाला ऊन आणि उष्णतेपासून आराम मिळतो, पण त्यामुळे आरोग्याचे खूप नुकसान होते. अशा वेळी जेव्हाही तुम्ही उन्हातून परताल तेव्हा काही काळ शरीराचे तापमान सामान्य होऊ द्या आणि नंतर कूलर-एसीमध्ये बसा.

Heatwave Precaution
Why Sweat In Summer : उन्हाळ्यात सारखा घाम का येतो ? जाणून घ्या त्यामागचे शास्त्रीय कारण

उष्माघात टाळण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा -

कामामुळे लोकांना अनेकदा उन्हात बाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत, उष्णता आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलणे फार महत्वाचे आहे. -

  • उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेट होण्यापासून वाचवा. यासाठी तुम्ही शिकंजी, ओआरएस, नारळपाणी इत्यादी पिऊ शकता.

  • उन्हाळ्यात अशी अनेक फळे मिळतात, ज्यांच्या सेवनाने शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. म्हणूनच या ऋतूत शक्यतो खरबूज, टरबूज, द्राक्षे इत्यादींचे सेवन करण्याचा प्रयत्न करा.

  • उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी तळलेले अन्न आणि उघड्यावर शिजवलेले अन्न न खाण्याचा प्रयत्न करा.

  • उन्हाळ्यात सलाड म्हणून तुमच्या आहारात कांदा आणि काकडीचा नक्कीच समावेश करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com