Ragi Barfi Recipe : तुम्हालाही मधुमेह आहे ? गोड खाऊ शकत नाही, मग ही नाचणीची बर्फी नक्की करुन पाहा

How To Control Sugar Level : हल्ली जगभरात मधुमेहाच्या आजारांने ग्रस्त अनेक रुग्ण आहेत. त्यामुळे गोड खाताना त्यांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
Ragi Barfi Recipe
Ragi Barfi RecipeSaam Tv

Diabetes Recipe : हल्ली जगभरात मधुमेहाच्या आजारांने ग्रस्त अनेक रुग्ण आहेत. त्यामुळे गोड खाताना त्यांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. लग्नसराईत आपल्या घरात मिठाई व इतर गोडाचे पदार्थ असतात. अतिप्रमाणात गोड खाल्ल्याने शरीरातील रक्ततातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.

परंतु, जर तुम्हाला गोड खायचे असेल आणि साखरेची पातळी नियंत्रणात (Control) ठेवायची असेल तर तुम्ही नाचणीची बर्फी ट्राय करु शकता. नाचणीची बर्फी मधुमेहींसाठी रामबाण आहे. यामुळे सतत भूक लागत नाही. तसेच वजनही कमी होण्यास मदत होते. जाणून घेऊया याची रेसिपी.

Ragi Barfi Recipe
Ragi Idli Recipe : मधुमेहाला कंट्रोल करेल नाचणीची इडली, अशाप्रकारे बनवा परफेक्ट रेसिपी

1. साहित्य

  • नाचणी पीठ- 1 कप

  • मावा- 1/2 कप

  • दूध (Milk) - 1 कप

  • चिरलेले ड्रायफ्रुट्स - 2 चमचे

  • खसखस- 1 चमचा

  • गूळ - 1 कप

  • तूप - 2 चमचे

2. कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात नाचणीचे पीठ घ्या. त्यानंतर कढईत देशी तूप (Ghee) टाकून गरम करा.

  • तूप वितळल्यानंतर त्यात चिरलेला ड्रायफ्रूट्स घालून मंद आचेवर तळून घ्या. ड्रायफ्रुट्स सोनेरी झाल्यावर एका भांड्यात काढून बाजूला ठेवा.

  • आता ट्रेचा आधार तुपाने ग्रीस करा.

  • यानंतर खसखस ​​शिंपडा आणि बाजूला ठेवा.

  • यानंतर कढईतील उरलेल्या तुपात नाचणीचे पीठ घालून ढवळत राहा आणि मंद आचेवर तळून घ्या.

  • पीठ चांगले भाजल्यावर त्यात ठेचलेला गूळ घालून गूळ वितळेपर्यंत शिजवा.

  • गूळ वितळल्यानंतर त्यात तळलेले ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करावे. मिश्रण पॅनमधून बाहेर पडेपर्यंत शिजवा.

Ragi Barfi Recipe
Bhindi For Diabetes : उच्च रक्तदाब व मधुमेहावर फायदेशीर ठरेल भेंडी; कसे कराल सेवन? जाणून घ्या
  • मिश्रण शिजल्यानंतर खसखसच्या ट्रेमध्ये ठेवा आणि सर्वत्र सारखे पसरवा. यानंतर काही वेळ थंड होऊ द्या.

  • मिश्रण थंड होऊन सेट झाल्यावर चाकूच्या साहाय्याने हव्या त्या आकारात कापून घ्या.

  • नंतर एक मिनिट फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून बर्फी चांगली सेट होऊ शकेल.

  • अधिक पौष्टिक व आरोग्यासाठी बहुगुणी आहे नाचणीची बर्फी

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com