Skin Glowing Tips : त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फायदेशीर ठरेल मसूरची डाळ, या पद्धतीने लावल्यास चेहरा अधिक उजळेल

Beauty Tips : या ऋतूमध्ये कितीही त्वचेची काळजी घेतली तरी चेहरा हा अधिक काळपट पडतो.
Skin Glowing Tips
Skin Glowing TipsSaam Tv

Masoor Dal Benefits : उन्हाळ्यात बरेचदा आपला चेहरा ड्राय पडतो किंवा तो अति तेलकट होतो. या ऋतूमध्ये कितीही त्वचेची काळजी घेतली तरी चेहरा हा अधिक काळपट पडतो. महागातल्या क्रिमपासून घरगुती अनेक उपाय करुनही चेहरा काही उजळत नाही.

आपण स्वयंपाकघरातील अनेक पदार्थांचा (Food) वापर करुन त्वचेचा पोत सुधारण्याचा प्रयत्न करतो परंतु, काही गोष्टीचे योग्य प्रमाण असणे देखील गरजेचे आहे. आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारी डाळ ही मसूरची असते. आपल्या दैनंदिन आहारासोबतच तिचा वापर आपण त्वचेचा (Skin) पोत सुधारण्यासाठी करु शकतो

Skin Glowing Tips
Skin Care Tips : बदलत्या हवामानात अशी घ्याल त्वचेची काळजी !

मसूर डाळीमध्ये उच्च प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असते. याचा वापर त्वचेसाठी केल्याने फायदा होतो. याचा फेस पॅक (Face Pack), स्किन एक्सफोलिएशन, पोर्स ओपनिंग आणि ब्लॅक हेड काढणे यात अनेक इतर ब्यूटी बेनेफिट्स आहेत. चला जाणून घ्या की त्वचेसाठी मसूर डाळ कशी लावावी

1. ड्राय स्किनसाठी

कोरडी पडलेल्या त्वचेसाठी मसूर डाळीचा फेस पॅक हा अधिक प्रभावी आहे. 2 चमचे मसूर डाळीला दूधात रात्रभर भिजवा व सकाळी त्याची पेस्ट बनवा. मान व त्वचेवर व्यवस्थित लावा व 20 मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ धूवा.

Skin Glowing Tips
Sunscreen Mistake in Summer Season : तुम्हाला देखील उन्हाळ्यात सनस्क्रीन लावण्याची सवय आहे ? जाणून घ्या योग्य पद्धत

2. स्क्रबिंग एजंट

डाळीला त्वचेसाठी चांगले स्क्रिबिंग एजेंट मानले जाते. २ चमचे वाटलेली डाळ व १ चमचा कच्चे दुध घेऊन त्यात ओट्स घाला. त्वचेला हे नीट लावा व सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

3. शरीरावरचे केस काढण्यासाठी

चेहरा टोन पुन्हा आणण्यासाठी किंवा स्किन टोन उजळवण्यासाठी या पॅकमध्ये संत्रीच्या सालीचा वापर केल्यास त्वचा अधिक उजळण्यास मदत होते. यात 100 ग्रॅम मसूर डाळ, 50 ग्रॅम चंदन, संत्र्याच्या साली रात्रभर दूधात भिजवा जाड आणि गुळगुळीत पेस्ट करण्यासाठी सर्व एकत्र बारीक करा. 15-20 मिनिटे सुकू द्या व नंतर त्यावर तेल लावा. थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

Skin Glowing Tips
Reel Star Trupti Rane : हम चले बहार में..., Bunny चा वेकेशन मोड ऑन !

4. त्वचेला हायड्रेट करा:

मसूर आणि मधाचे मॉइश्चरायझिंग गुणधर्म त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. मसूर, दालचिनी, मीठ आणि मध मिसळा आणि 15 मिनिटे भिजवा. व कोमट पाण्यात घालून आंघोळ करा.

5. अँटी-एजिंग एजंट्स वापरा:

सूर्यकिरण त्वचेसाठी खूप हानिकारक असतात, त्यामुळे त्याचा परिणाम दीर्घ कालावधीत दिसून येतो. मसूर डाळ फेस पॅक त्वचेसाठी खूप मदत करतात. मसूरमध्ये असलेले घटक वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करू शकतात, ते अँटीएजिंग एजंट म्हणून काम करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com