Aadhar Card For Child : तुमच्या मुलाचे आधार कार्ड बनवायचे आहे ? मग, या ऑनलाइन स्टेप्स फॉलो करा

How to make Child Aadhar card : लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी अगदी कमी कागदपत्रांची आवश्यकता असते.
Aadhar Card For Child : तुमच्या मुलाचे आधार कार्ड बनवायचे आहे ? मग, या ऑनलाइन स्टेप्स फॉलो करा

Online Aadhar Card Process : मुल जन्माला आल्यानंतर काही ठराविक वयानंतर त्यांचे देखील आधार कार्ड काढले जाते. लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी अगदी कमी कागदपत्रांची आवश्यकता असते.

मुलांचे (Child) आधार कार्ड हे मुख्यत्वे पालकांच्या आधारावर तयार केले जाते. यामध्ये फिंगरप्रिंट किंवा इतर कागदपत्रांची आवश्यकता नसते. हल्ली लहान मुलांच्या आधार कार्डचा (Aadhar Card) उपयोग हा मुलांच्या शाळेसाठी किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी लागतो. त्यासाठी आधार कार्ड कसे बनवायचे हे जाणून घेऊया.

Aadhar Card For Child : तुमच्या मुलाचे आधार कार्ड बनवायचे आहे ? मग, या ऑनलाइन स्टेप्स फॉलो करा
Aadhar Card Download : आधार कार्ड हरवले आहे ? १४ अंकी नंबरही लक्षात नाही ? कसे कराल डाउनलोड

1. लहान मुलांचे आधार कार्ड बनवताना कोणती कागदपत्रे आवश्यक ?

  • आधार कार्ड बनवताना डिस्चार्ज स्लिप किंवा जन्म प्रमाणपत्र अनिवार्य असते.

  • त्याचप्रमाणे जर मूल शाळेत जायला लागले असेल तर त्याचा शाळेचे ओळखपत्र दाखवून आधार कार्ड बनवता येते.

2. आधार कार्ड कसा बनवाल ?

  • आधार कार्ड मिळविण्यासाठी, तुमच्या मुलांचे जन्म प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच पालकांच्या आधारकार्डचा तपशील द्यावा लागणार आहे.

  • लहान मुलांच्या आधार कार्डला ब्लू आधार कार्ड असेही म्हणतात.

Aadhar Card For Child : तुमच्या मुलाचे आधार कार्ड बनवायचे आहे ? मग, या ऑनलाइन स्टेप्स फॉलो करा
Aadhar-Bank Account Link : तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ? आता घरबसल्या कळेल, फॉलो करा स्टेप

3. या स्टेप्स फॉलो करुन बनवा आधार कार्ड

  • सर्वप्रथम, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in ला भेट द्यावी लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला नोंदणी करावी लागेल. यासाठी आधार कार्ड नोंदणीवर क्लिक करा.

  • यानंतर, मुलाच्या पालकांना त्यांचे तपशील द्यावे लागतील, ज्यामध्ये मुलाचे नाव, पालकांचा फोन नंबर (Phone number) आणि बायोमेट्रिक डेटा समाविष्ट असेल.

  • त्यानंतर घराचा पत्ता, राज्य आणि इतर माहिती फॉर्ममध्ये सबमिट करावी लागेल.

  • यानंतर तुम्हाला पुढील कारवाईसाठी UIDAI केंद्राला भेट द्यावी लागेल.

  • मूल आणि तुमची संपूर्ण माहिती आधार केंद्रावर पडताळून पाहावी लागेल. अशा प्रकारे आधार कार्ड तयार होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com