
Travel Tips : उन्हाळी सुट्टी लागली की, आपल्याला बाहेर फिरण्याचे वेध लागतात. त्यासाठी आपण गुगल किंवा सोशल मीडियावर अनेक ठिकाणे सर्च करत असतो. जगभरात असे अनेक देश आहेत जे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे त्यातील एक भारत.
भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी फिरण्यासाठी प्रसिद्ध आहेत पण त्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे. या ठिकाणी कॅम्पिंगला (Camping) गेल्यानंतर तुमचा प्रवास देखील छान होईल. राष्ट्रीय उद्याने, पर्वत, वाळवंट किंवा समुद्रकिनारे असो, भारतात भेट देण्यासाठी आणि कॅम्पिंगसाठी अनेक ठिकाणे आहेत, जिथे दरवर्षी मोठ्या संख्येने देश-विदेशातील पर्यटक (Travel) येतात.
भारतातील (India) या ठिकाणांना भेट देण्यासाठी तुम्ही अनेक पर्याय शोधत असाल तर तुम्ही ट्रेनने प्रवास करु शकतात. ट्रेन हे सगळ्यात सोपे साधन ठरेल ज्याच्या मदतीने तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पोहोचू शकता. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना कॅम्पिंगची आवड आहे आणि जे सहसा कुठेतरी जाण्यासाठी ट्रेनने (Train) प्रवास करतात, तर आज आम्ही तुम्हाला भारतातील काही अनोळखी ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही रेल्वेने सहज जाऊ शकता.
1. जैसलमेर, राजस्थान
जर तुम्हाला वाळवंटात कॅम्पिंगचा आनंद घ्यायचा असेल, तर राजस्थानमधील जैसलमेर तुमच्यासाठी एक उत्तम डेस्टिनेशन ठरेल. समृद्ध संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या जैसलमेरमधील वाळूचे ढिगारे तुम्हाला भुरळ घालतील. वाळवंटाच्या या विस्तीर्ण भागात तुम्ही डेझर्ट सफारी, उंट सवारी, लोकनृत्य आणि मैफिलींचा आनंद घेऊ शकता. तुम्ही इथे ट्रेनने सहज पोहोचू शकता.
2. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड
आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले उत्तराखंड देशातील आणि जगातील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अनेक पर्यटनस्थळे येथे पाहण्यासारखी आहेत. त्यामुळेच पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी आणि कॅम्पिंगसाठी येथे येतात. उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे यापैकी एक ठिकाण आहे, जिथे लोक दुर्मिळ प्रजातीचे प्राणी आणि पक्षी पाहण्यासाठी येतात. यासोबतच येथील निसर्गसौंदर्य अनुभवण्याची संधीही तुम्हाला मिळणार आहे. हे उद्यान रामनगर रेल्वे स्थानकाजवळ आहे.
3. सुजान जावई बिबट्या कॅम्प, राजस्थान
जर तुम्ही प्राणी प्रेमी असाल आणि वन्यजीव तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही राजस्थानच्या पाली येथे असलेल्या सुजन जावई बिबट्या कॅम्पला भेट देऊ शकता. येथे असणाऱ्या बिबट्या जगभरातील लोकांना आकर्षित करतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक येथे पोहोचतात. तुम्हालाही बिबट्या जवळून पाहायचा असेल तर तुम्ही ट्रेनने इथे सहज पोहोचू शकता.
4. कनाताल, उत्तराखंड
नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या उत्तराखंडमध्ये अशी अनेक न पाहिलेली पर्यटन स्थळे आहेत. जे सौंदर्यांने नटलेले आहेत. कनाताल हे उत्तराखंडमधील असेच एक ठिकाण आहे, जिथे तुम्ही कॅम्पिंगसाठी ट्रेनने सहज पोहोचू शकता. तसेच, नवी दिल्लीपासून फक्त 5 तासांच्या अंतरावर हे आहे, जिथे तुम्ही स्वतः गाडी चालवू शकता.
5. कान्हा राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश
भारताचे हृदय म्हटल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत. दरवर्षी अनेक लोक येथे भेट देण्यासाठी येतात. मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यान देशभर प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला वाघ आणि वन्यजीव पाहण्याची संधी मिळते. येथे जाण्यासाठी कोणतीही थेट ट्रेन नाही, परंतु तुम्ही जबलपूर, गोंदिया आणि नागपूर येथून गाड्यांद्वारे येथे पोहोचू शकता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.