Blood Sugar Increase : दुपारी जेवताना तुम्ही देखील या चुका करताय? तर वाढू शकते रक्तातील साखरेची पातळी, वेळीच घ्या काळजी

Unhealthy Lunch Habits That Increase Your Blood Sugar Level : बरेचदा मधुमेह असणारी व्यक्ती खाण्यापिण्याची बाबतीत चुका करतात ज्यामुळे त्याच्या शरीरातील शुगर लेवल वाढते
Blood Sugar Increase
Blood Sugar IncreaseSaam tv

Eating Bad Habits : भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 100 दशलक्षाहून अधिक भारतीय आहेत ज्यांना मधुमेह होण्याचा उच्च धोका आहे. ही धक्कादायक बातमी काही वेळापूर्वी ICMR च्या अहवालात समोर आली होती. या अहवालानुसार, भारतीय लोकसंख्येपैकी 15.3% म्हणजे सुमारे 136 दशलक्ष लोक मधुमेहपूर्व अवस्थेत आहेत.

मधुमेह हा आजार खरेतर खाण्यापिण्याची बदलेली जीवनशैली, टेन्शन व मानसिक त्रास यामुळे होतो. बरेचदा मधुमेह असणारी व्यक्ती खाण्यापिण्याची बाबतीत चुका करतात ज्यामुळे त्याच्या शरीरातील शुगर लेवल वाढते. त्यासाठी आपण आपला आहारत कशा पद्धतीचा घेतो यावरही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जाणून घेऊया जेवताना कोणत्या चुका करु नये याबद्दल

Blood Sugar Increase
Yoga For Diabetes : मधुमेहींनो, सकाळी उठल्यानंतर ही योगासने करा; ब्लडशुगर राहिल नियंत्रणात

1. नाश्ता वगळणे योग्य आहे का?

सकाळचा नाश्ता (Breakfast) वगळल्याने रक्तातील साखरेच्या पातळीत प्रचंड चढ-उतार होतात. विशेषत: जेव्हा तुम्ही दुपारी उशिरा जेवता. त्याच वेळी, सकाळी सर्वात आधी नाश्ता केल्याने रक्तातील साखरेची (Sugar) पातळी नियंत्रणात राहते. दिवसाची सुरुवात चांगल्या आणि सकस आहाराने केल्यास मधुमेह आणि त्याच्याशी संबंधित होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो . त्यामुळे सकाळचा नाश्ता वगळू नका.

2. कधीही दुपारचे जेवण योग्य आहे का?

जेवणाच्या वेळेत लोक सहसा अनेक चुका करतात ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते. काहीजण सकाळचा नाश्ता न करता सरळ दुपारी जेवणात जड पदार्थ खातात. तसेच त्यांच्या जेवणाची वेळ ही निश्चित नसते. असे केल्याने शरीरातील चयापचय नियंत्रित होत नाही.

Blood Sugar Increase
Morning Foods For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेस्ट आहेत 'हे' पदार्थ, रक्तातील साखर राहील नियंत्रणात !

3. दुपारच्या जेवणासाठी तुम्ही काही खाऊ शकता का?

बरेच जण दुपारच्या जेवणात फक्त पोट भरण्यासाठी काहीही पदार्थ खातात. योग्य पोषण आहाराकडे लक्ष देत नाही असे केल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. तसेच मधुमेहाचा (Diabetes) धोका देखील वाढतो. त्यामुळे दुपारच्या जेवणात कर्बोदकांपासून ते प्रथिने आणि निरोगी चरबीपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश करा आणि संतुलित आहार घ्या.

4. नैसर्गिक पदार्थांऐवजी पॉइश्चराइज्ड पदार्थ का खाऊ नयेत?

अनेकांना वेळीच बचत व कामाच्या गडबडीमध्ये सकाळचा नाश्ता बनवता येत नाही. त्यासाठी ते रेडी टू कूकसारखे पदार्थ खातात. तर काहींना सुपरमार्केटमधून आणलेले सॅण्डविच खाणे पसंतीस पडते. यामुळे त्याचा दीर्घकाळ शरीरावर हानिकारक परिणाम देखील होतात. अशा खाद्यपदार्थांमध्ये भरपूर मीठ वापरले जाते, ज्यामुळे त्यांना चव तर चांगली मिळतेच, शिवाय खाद्यपदार्थांचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ह्जचाही वापर होतो.

Blood Sugar Increase
Diabetes Causes : साखरेमुळे नाही तर या पदार्थांमुळे जडतो मधुमेह...

5. दुपारच्या जेवणापूर्वी किंवा नंतर कृत्रिम पेय का पिऊ नये?

आजकाल खाण्यासोबतच कार्बोनेटेड किंवा आर्टिफिशियल स्वीटनर पेये पिण्याचा ट्रेंड झाला आहे. पंरतु, तुम्ही देखील असे पेय पित असाल तर त्याने तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढते. त्यामध्ये फक्त कॅलरीज असतात आणि त्यांचे पोषणमूल्य नसते; तिसरे, ते भूक कमी करतात आणि तुम्हाला निरोगी पदार्थ खाण्यापासून प्रतिबंधित करतात.

6. दुपारच्या जेवणानंतर लगेच डेस्कवर परतणे योग्य आहे का?

प्रत्येक व्यक्तीवर कामाचे दडपण असते, परंतु असे असूनही स्वत:साठी वेळ काढणे खूप गरजेचे आहे. जेवल्यानंतर लगेच सीटवर येण्याऐवजी 10 मिनिटे चालण्याची सवय लावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com