How To Increase Cibil Score: कर्ज घ्यायचयं? पण क्रेडिट स्कोर बिघडलाय ? कसा सुधारवाल तुमचा 'क्रेडिट स्कोर'

How To Increase Credit Card Score in 30 days: कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्याआधी बँक तुमचा क्रेडीट स्कोर पाहाते.
How To Increase Credit Card Score
How To Increase Credit Card ScoreSaam Tv

How can I raise my credit score fast : कर्ज घेताना आपला क्रेडिट स्कोर महत्त्वाचा असतो. जर, तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला अगदी कमी व्याजदरात सहजपणे कर्ज मिळू शकते. पण जर, तुमचा क्रेडिट स्कोर कमी असेल तर मात्र तुम्हाला कर्ज घेणे कठीण होऊन जाते आणि कर्ज मिळाले तरी त्याचा व्याजदरही अधिक जास्त असतो. अशा वेळी काय करावे हे जाणून घेऊया.

वाढती महागाई आणि बदलती जीवनशैली यामुळे माणसाच्या गरजेत वाढ झाली आहे. या गरजांची पुर्तता करण्यासाठी लोकं गृह कर्ज (Loan), वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जांसाठी क्रेडिट कार्ड्सचा आधार घेतात. परंतु कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्याआधी बँक (Bank) तुमचा क्रेडीट स्कोर पाहाते. क्रेडिट स्कोरला सिबील स्कोर असे देखील म्हणतात.

How To Increase Credit Card Score
Which Debit-Credit Card Use : तुम्ही कोणतं Debit-Credit कार्ड वापरता ? गोल्ड, प्लॅटिनम की, टायटॅनियम ?

तुमच्या क्रेडिट स्कोर वरुन तुमच्या व्यवहारिक वर्तना बाबतची नोंद पाहिली जाते. जर तुमचा क्रेडीट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला चांगल्या व्याजदराने सहजणे कर्ज मिळू शकते. पण जर तुमचा क्रेडिट स्कोर कमी असेल तर तुम्हाला कर्ज घेण्यामध्ये अडचण येऊ शकते आणि व्याजदर ही अधिक असू शकते.

1. कसा वाढतो क्रेडिट स्कोअर?

आपला क्रेडिट स्कोर हा आपल्या चुकीमुळे वाढू शकतो. कर्जाची राहिलेली परफेड, क्रेडिट कार्डचे हफ्ते वेळेत न भरणे. या सर्व गोष्टी आपला क्रेडिट स्कोर बिघडण्याचे कारण ठरु शकतात. तेव्हा तुम्ही या टिप्स (Tips) आणि ट्रिक्सचा वापर करुन आपला क्रेडिट स्कोर सुधारू शकता.

How To Increase Credit Card Score
Gmail Account Close : गुगल बंद करणार का Gmail ? यात तुमचे देखील अकाउंट आहे का? कसे कळेल? जाणून घ्या

2. बिल आणि हफ्ता

 • जर तुम्ही एखाद्या बँकेतून कर्ज काढले असेल तर त्याच्या व्याजाचे हफ्ते वेळेत भरावे.

 • क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याचे बिल देखील वेळेत भरावे. यामुळे आपल्या क्रेडिट स्कोर सुधारत जाईल.

3. क्रेडिट कार्डचा मर्यादित वापर

 • क्रेडिट कार्ड वापरत असल्यास त्याच्या संपूर्ण मर्यादेच्या 30 टक्के वापर करावा.

 • महागड्या वस्तूची खरेदी क्रेडिट कार्डने करणे टाळावे. त्याने क्रेडिट स्कोर वाढतो.

 • जर एखाद्या वेळी मोठी रक्कम भरावी लागल्यास त्याचे बिल वेळे आधी चुकते करावे.

How To Increase Credit Card Score
Aadhar Card Download : आधार कार्ड हरवले आहे ? १४ अंकी नंबरही लक्षात नाही ? कसे कराल डाउनलोड

4. एका वेळी एक कर्ज

 • क्रेडिट स्कोर चांगला ठेवण्यासाठी एकावेळी एकाहून अधिक कर्ज घेणे टाळावे. कारण अशा परिस्थितीत तुमच्यावर ईएमआयचं ओझं वाढू शकत.

 • अनेकदा ईएमआय चुकू शकतात आणि त्याचा परिणाम आपल्या क्रेडिट स्कोरवर होऊ शकतो.

5. विचार करुन कर्जाचे जामीनदार व्हा

 • कोणाच्याही कर्जाचे साक्षीदार होण्याआधी नीट विचार करा. कारण त्या व्यक्तीने कर्जाची परतफेड वेळेत न केल्यास त्याचा फटका तुम्हाला देखील बसू शकतो.

 • शेवटी याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होऊ शकतो. तेव्हा अशाच व्यक्तीचे साक्षीदार व्हा जो खात्रीशील असेल.

6. क्रेडिट कार्डची मर्यादा एकदाच निश्चित करावी

 • जास्त मर्यादेचे क्रेडिट कार्ड असणे ही कौतुकाची गोष्ट नाही. जितकी क्रेडिट कार्डची मर्यादा जास्त तितके त्याचे बिल वाढीव तेव्हा जास्त मर्यादेचे क्रेडिट कार्ड जास्त खर्चिक ठरते.

 • आर्थिकदृष्टा आपल्या क्रेडिट कार्डची मर्यादा सारखी वाढवणे आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरते.

 • क्रेडिट कार्डची मर्यादा जेवढी जास्त तेवढे त्याचे बिल वाढीव सारखी-सारखी कार्डची मर्यादा वाढवल्याने आपला खर्चिक स्वभाव दिसून येतो आणि याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com