
रणजीत माजगावकर
Kolhapur News : विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज (शनिवार) काेल्हापूरात शिंदे-फडणवीस सरकारच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्याचे आर्थिक शिस्त बिघडली असून त्याला जबाबदार कोण असा सवाल पवार यांनी केला आहे. महाविकास काळातील विकास कामांवरची बंदी हायकोर्टाने उठवली तरी हे सुप्रीम कोर्टात गेले अरं काय कारण आहे. आम्ही तुम्हांला आमच्या घरचं काम सांगत नाही जनतेच्या हिताची कामं सांगत असताे असेही पवार यांनी सत्ताधा-यांना सुनावलं. (Maharashtra News)
काेल्हापूरातील एका हाॅटेलच्या उदघाटनाप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते राज्याचे विराेधी पक्ष नेते अजित पवार हे उपस्थितांसमाेर बाेलत हाेते. मी राज्य उत्पादन शुल्क मंत्री असताना काेणाचे काम केले नाही असा सांगणारा एक तरी महाराष्ट्रातील माणूस समोर आणा असे ठामपणे पवार यांनी नमूद केले. मी काम करताना हा काँग्रेसचा, हा भाजपचा हे बघत नाही. त्याने आणलेले काम व्हावे यासाठी माझा प्रयत्न असताे.
दरम्यान पवार यांनी भाषणात काेल्हापूरातील विकासकामात काहीजण अडथळा आणत असल्याची तक्रारी कानी आल्या आहेत. सरकार येतील अन् जातील पण सत्तेचा गैरवापर, मस्ती आणि नशा डोक्यात जाऊ देऊ नका असा सल्ला पवार यांनी सत्ताधा-यांना दिला.
ते म्हणाले चार दिवस सासूचे असतात तसं चार दिवस सूनेचे पण असतात. हे वेडे वाकडं वागणा-यांनी लक्षात ठेवावे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका असेही पवार यांनी नमूद केले.
नाव न घेता अबिटकरांना टाेला
दरम्यान विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज काेल्हापूरात काेणाचे नाव न घेतला केलेले विधान हे राज्यकर्त्यांना असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) गटाचे आमदार प्रकाश अबिटकर (mla prakash abitkar) यांना उद्देशून म्हटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.