
अमर घटारे
अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला. तसेच रवी राणा (Ravi Rana) यांनी आमदार बळवंत वानखडे यांच्यावर केलेल्या टीकेच्या विरोधात राणा (Amravati) दाम्पत्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Maharashtra News)
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे मंगळवारी (१२ सप्टेंबर) दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेदरम्यान खासदार नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्याकडून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कडक नोटा घेतल्या आणि काम दुसऱ्याचं केल्याचे विधान केले होतं. तसेच काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांच्यावर रवी राणा यांनी खालच्या भाषेत टीका केली होती. यावर अमरावतीत युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे.
युवक काँग्रेसकडून (Congress) अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच नवनीत राणा यांची ईडी व आर्थिक गुन्हे शाखेच्या मार्फत चौकशी करावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी आमदार बळवंत वानखडे यांचा अपमान केल्याने रवी राणा विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसचे वैभव देशमुख यांनी केली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.