Yavatmal : ब्रेकअप झालं म्हणून प्रेयसीचे पर्सनल फोटो केले व्हायरल; भावाला व्हिडिओ पाठणाऱ्या नराधमाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

या घटनेत प्रियकराने आपल्या प्रेयसीचे पर्सनल फोटो सोशल मीडियावर व्हायरल केलेत.
Yavatmal
Yavatmal SaamTv

संजय राठोड

Yavatmal : प्रेमी युगल आणि त्यांचे अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होतात. यात अनेक व्हिडिओमध्ये दोघांमधील भांडणे तर कधी प्रेम पाहायला मिळतं. अशाच प्रेमात अनेकजण चंद्रतारे तोडून आणण्याच्या देखील बाता करतात. मात्र यवतमाळ येथे प्रेमाला काळिमा फासणारी एक विचित्र घटना घडली आहे. या घटनेत प्रियकराने आपल्या प्रेयसीचे पर्सनल फोटो सोशल मीडियावर व्हायरल केलेत. (Latest Yavatmal News)

तीन वर्षांच्या प्रेमाला तरुणाने एका क्षणात संपवलं आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, हे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. तरुणाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून भलताच खेळ केला. काही दिवसांपूर्वी त्या दोघांमध्ये जोरदार भांडण होऊन ब्रेकअप झालं. यामुळे प्रेयसी खूप दुखावली आणि तिने प्रियकराशी बोलणं बंद केलं. जवळपास एक महिनाभर हे दोघे एकमेकांशी बोलले नाहीत.

प्रेयसीने आपल्याकडे परत यावे यासाठी त्याने खूप प्रयत्न केले मात्र मुलीची त्याच्याकडे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने तरुणीचे पर्सनल फोटो आणि व्हिडिओ थेट तिच्या भावाला आणि मैत्रीणींना पाठवले. सोशल मीडियावर ते व्हायरल केले. यामुळे तरुणी खूप घाबरून गेली. नेमकं काय करावं तिला समजेना. त्यामुळे तिने अवधूतवाडी पोलीस स्टेशनला धाव घेतली. इथे पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला.

Yavatmal
Aurangabad News: भावाशी व्हिडिओ कॉलवर बोलतच संपविले जीवन; घरगुती वादाची शक्‍यता

रितेश जयस्वाल असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्याचा शोध घेतला असून त्याच्या मुसक्या अवळल्या आहेत. तसेत त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस आणखीन जास्त चौकशी करत आहेत. जीवापाड ज्याच्यावर प्रेम केलं त्या प्रियकराने असा घात केल्याने पीडितेला मोठा धक्का बसला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com