
बीड : बीड जिल्ह्यातील देवस्थान जमीन घोटाळ्यातील आरोपींना गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभय असून तपास यंत्रणेवर ते दबाव टाकत आहेत. या प्रकरणात (Beed) अँटी करप्शन ब्युरो, महसूल आणि पोलिसांकडून कसलाच तपास केला जात नाही. सुरेश धस (Suresh Dhas) हे भाजपचे आमदार असल्याने गृहमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांना अभय देत आहेत. असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला आहे. (Breaking Marathi News)
बीडच्या आष्टी तालुक्यात हिंदू देवस्थान जमिनी भूखंड माफियांनी गिळंकृत केल्या असून यामध्ये तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केली होती. या राम खाडे यांच्या तक्रारीवरून आणि त्यांच्या रिट पिटीशनवरून हायकोर्टाच्या आदेशानुसार अँटी करप्शन ब्युरो बीडकडून भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांच्या पत्नी, भाऊ आणि इतरांवर २९ नोव्हेंबर २०२२ ला जमीन घोटाळ्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक निकेश कौशिक हे आमदार सुरेश धस यांना वाचविण्यासाठी तपासात हस्तक्षेप करुन (Land Scam Case) तपासाची दिशा बदलुन आरोपींना सुटण्यासाठी मदत करीत आहेत. यामुळे मा. उच्च न्यायालयाचे आदेशाचे अवमान होत आहे. त्यामुळे निकेश कौशिक यांना या प्रकरणात सह आरोपी करा. अशी मागणी तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांसह, अप्पर मुख्य सचिव गृहविभाग यांच्याकडे केली आहे.
काय म्हटलंय खाडेंनी दिलेल्या तक्रारीत?
आष्टी तालुक्यातील देवस्थान इनाम जमीन बनावट खालसा आदेश प्रकरणात हिंदू व मुस्लीम (वक्फ) च्या इनाम जमीन आहेत. वक्फ मंडळाने ३ प्रकरणात पोलीस स्टेशन आष्टी येथे गुन्हे दाखल करुन त्याची SIT मार्फत तपास चौकशी सुरु आहे. यामधील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली होती. यामधील हिंदु ८ देवस्थान इनाम जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हे दाखल होत नसल्यामुळे मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे क्रिमीनल रिट पिटीशन दाखल केलेले होते. त्यांच्या आदेशान्वये मा. उपअधिक्षक अॅन्टीकरप्शन ब्युरो बीड यांना कारवाईचे आदेश देण्यात आलेले होते.
आष्टी पोलीस स्टेशन येथे २९ नोव्हेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल झालेला असून त्यामधील निष्पन्न झालेल्या ३८ पैकी एकाही आरोपीला अटक करण्यात आले नाही किंवा चौकशीसाठी ताब्यात घेतले नाही. वक्फच्या इनाम जमिनीतील आरोपी व हिंदु देवस्थान इनाम जमिनीतील आरोपी व रॅकेटमधील सुत्रधार एकच असून वक्फ प्रकरणात त्यांना अटक होती. हिंदु देवस्थान इनाम जमिन प्रकरणात अटक किंवा चौकशीसाठी ताब्यात घेतले जात नाही. वास्तविक या प्रकरणातील मुख्य सुत्रधार आमदार सुरेश धस वि.प.स. असून ते भाजपचे आहेत. राज्यात घटनाबाह्य शिवसेना व भाजपचे सरकार असून देवेंद्र फडवणीस हे या आरोपींना अभय देत आहेत. व ते तपासावर दबाव आणित आहेत.
उपअधिक्षक एसीबी बीड यांच्याकडुन तपास होत नसेल तर याप्रकरणाचा तपास आयपीएस अधिका-याकडे देण्याचे आदेश मा. महासंचालक एसीबी मुंबई यांनी का दिले नाहीत? या प्रकरणात एक सक्रीय रॅकेट कार्यरत असल्याचे मा. उपमुख्यमंत्री म.रा. यांनी विधानसभेत सांगितले, हे रॅकेट कोणी शोधून काढायचे? यामधील मुख्य सुत्रधार कोणी शोधायचा व कसा शोधायचा याचे मार्गदशन वरिष्ठ कार्यालयाने केले का? या प्रकरणात ॲन्टी करप्शन ब्युरोची भुमिका संशयास्पद असून चौकशी होत नसेल किंवा एसीबी चौकशीसाठी समर्थ नसेल तर हे प्रकरण ईडीकडे वर्ग का केले नाही? याची चौकशी करण्यात यावी व तपासातील दिरंगाई व आरोपी ना होत असलेली मदत लक्षात घेता, निकेत कौशिक महासंचालक ॲन्टी करप्शन ब्युरो, म.रा. मुबई यांना सह आरोपी करण्याचे आदेश शासनाने द्यावेत; अशी मागणी केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.