Vaijapur Tractor Accident: वैजापूरमध्ये भरधाव ट्रॅक्टर कालव्यात कोसळला; दोघे भाऊ...

VaijapurTractor Accident: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Vaijapur Tractor Accident
Vaijapur Tractor AccidentSaam TV

Vijapur Tractor Accident: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावरून वळण घेताना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं आणि दोघे भाऊ पाण्यात पडले. यातील एक जण प्रवाहासोबत वाहून गेला.

तर दुसऱ्याने आधार शोधल्याने त्याचा जीव वाचला. थरकाप उडवणारी ही घटना महालगाव- शिरसगाव रस्त्यावर गुरुवारी (१८ मे) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.  (Breaking Marathi News)

Vaijapur Tractor Accident
Samruddhi Mahamarg Accident: भरधाव कारचा टायर फुटला अन् अनर्थ घडला; समृद्धी महामार्गावर भयानक अपघात, पाहा VIDEO

मोहन छबु धात्रक (वय ३५, रा.शिरसगाव) असं कालव्यात बुडालेल्या तरुणाचं नाव असून घटनेनंतर सात तासांनंतरही मोहन याचा शोध लागला नव्हता. या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, मोहन धात्रक व त्यांचा चूलत भाऊ अरुण धात्रक हे दोघे गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरने महालगावकडुन शिरसगावच्या दिशेने जात होते. (Latest Marathi News)

या रस्त्याने जात असतांना पुलाजवळ वळण घेतल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले व हा ट्रॅक्टर कालव्यात कोसळला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे मोहन हा वाहून गेला. तर अरुण धात्रक याने लगेचच लोखंडी ॲंगलचा आधार घेतल्याने त्याचा जीव वाचला.

Vaijapur Tractor Accident
Gautami Patil Dancer: महाराष्ट्राचा बिहार करू नका, अन्यथा.., छोटा पुढारी घनःश्याम दराडेचा गौतमीला इशारा

घटनेनंतर पाण्यात वाहून गेलेल्या मोहन धात्रक यांचा शोध घेणे सुरु आहे.मात्र,कालव्यात पाण्याचा वेग अधिक असल्याने तपास कार्यात अडचणी येत असल्याची माहिती विरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस (Police) उपनिरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी सांगितले. या घटनेमुळे शिरसगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com