Nashik News : नाशिक भूकंपाच्या धक्क्याने हादरले; २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

नाशिकमधून भूकंपाचं वृत्त हाती आलं आहे.
Earthquake
EarthquakeSaam Tv

Nashik News : नाशिकमधून भूकंपाचं वृत्त हाती आलं आहे. नाशिकच्या सुरगाणा परिसरात भूकंप झाल्याची माहिती समोर आले आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू सुरगाणा परिसर होता. या भूकंपात सुदैवाने कुठलीही मोठी हानी झाली नाही. (Latest Marathi News)

Earthquake
Pune : पुण्यात चाललंय काय? शहरात कोयता गँगचा धुमाकूळ; सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिककर भुकंपाच्या धक्क्यांने चांगलेच हादरले आहे. नाशिकच्या सुरगाणा परिसरात भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचे केंद्रबिंदू सुरगाणा परिसर होता. तर हा भूकंप आज, गुरुवारी दुपारी १२ वाजता भूकंपाचा हादरा बसला. भूकंपाचा धक्का हा २.६ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा होता.

नाशिकमध्ये भूकंप झाल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली. मात्र, सुदैवाने या भूकंपात कोणतीही मोठी हानी झाली नाही. सुरगाण्यात दुपारी भूकंपाचे धक्के जाणवल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण होते. मात्र, रात्री उशिरा हे हादरे भूकंपाचे असल्याचं स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आलं.

Earthquake
Eknath Shinde : शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार; लम्पी साथ रोगाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

गेल्या महिन्यात दिल्लीकरांनी अनुभवले भूकंपाचे धक्के

दरम्यान, एका महिन्यापूर्वी देशाची राजधानी नवी दिल्लीला भूकंपाचे हादरे बसले होते. नवी दिल्लीपासून पश्चिमेला ८ किमी अंतरावर रात्री ९.३० वाजता २.५ रिश्टर स्केलचा भूकंप धक्का जाणवला होता. या भूकंपाचे (Earthquake) केंद्र जमिनीच्या खाली 5 किमी अंतरावर असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली होती.

दिल्लीमध्ये गेल्या महिन्यात दोनवेळा भूकंपाने हादरा बसला होता. १२ नोव्हेंबर रोजी दिल्ली रात्री साधारण ८ वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ५.४ रिश्टर स्केल होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com