Bacchu Kadu On Maratha Arakshan : 'मराठा हा कुणबी, हे सूर्य प्रकाशाइतकं सत्य' आरक्षणाबाबत बच्चू कडूंचा सरकारला सल्ला

आज देखील राज्यभरात मराठा समाज आरक्षणाच्या मुद्यावरुन आंदाेलन करीत आहे.
Mla Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Maratha Reservation
Mla Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Maratha ReservationSaam TV

- तबरेज शेख

Bacchu Kadu News : कुणबी असणाऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं जात आहे. मराठा हा कुणबी आहे, हे सूर्य प्रकाशाइतकं सत्य आहे. त्यामुळे मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण द्यावे असे मत आमदार बच्चू कडू यांनी नाशिक (bacchu kadu in nashik) येथे व्यक्त केले. (Maharashtra News)

Mla Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Maratha Reservation
Congress Samvad Yatra 2023 : पंतप्रधानपदावरून गडकरी मोदींचे भांडण सुरू : नाना पटाेले

बच्चू कडू म्हणाले आरक्षणासाठी दोन-तीन समाज आग्रही आहेत. जातीचा प्रश्न असल्याने लोकांची आक्रमकता वाढल्याचे दिसत आहे. विदर्भातील सगळे मराठा हे ओबीसीमध्ये आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील ७५ टक्के मराठा हे ओबीसी आहे. फक्त आठच जिल्ह्यासाठी विरोध का हाेत आहे हे मला कळत नाही.

Mla Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Maratha Reservation
Pune News : खेडचे तत्कालीन तहसीलदार निलंबित, १७ कोटी ५६ लाख रुपयांच्या महसुलाच्या नुकसानीचा ठपका

कडू पुढं बाेलताना म्हणाले मराठा हा मुलुख आहे. त्यात मराठा लिहिणं सुरू केलं. त्यांचे मूळ कुणबी आहे. ओबीसी आरक्षण वाढवून त्यात त्यांना आरक्षण द्यावे. नोकरी हा विषय सोडला, तर आरक्षणाची गरज काय? असा सवाल यांनी कडू उपस्थित केला.

Mla Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Maratha Reservation
Sharad Pawar In Jalgaon : शरद पवार जळगावात दाखल, ६ क्विंटलच्या पुष्पहारानं होणार स्वागत

ते म्हणाले सध्या नोकरी हे पैसेवाली झाली आहे, म्हणून आरक्षणाला महत्त्व आले आहे. एकदा आमदार झाला की, नोकरी मिळाली, की मरेपर्यंत व्यवस्था होऊन जाते. दुष्काळाची झळ कधी अधिकारी आणि आमदारांना लागली का ? असा प्रश्न कडूंनी केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com