
Career Guidance For 12th Fail: आज बारावी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जाहीर होत आहे. यामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या मनातली धाकधूक वाढली आहे. अनेक विद्यार्थी या निकालासाठी वर्षभर अभ्यास करतात. प्रयत्नांची पराकाष्ठा करून घवघवीत यश मिळवतात. (Latest 12th Result 2023 News)
कोरोना महामारीमुळे अनेक विद्यार्थी अभ्यासात मागे पडले आहेत. त्यामुळे या नंतरच्या निकालावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. विद्यार्थ्याचं अभ्यासातून मन उडाल्याने अनेक विद्यार्थी असेही आहेत ज्यांनी कुटुंबियांच्या दबावामुळे 12 ची परीक्षा दिली आहे.
त्यामुळे अशा अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत अपयश येते. अथवा असेही अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी प्रचंड अभ्यास करूनही त्यांना परीक्षेत अपयश आलं आहे. असे झाल्यावर अनेक विद्यार्थी नाराज होतात. त्यांना आयुष्यात पुढे सर्व अंधार दिसू लागतो. मात्र आज आम्ही 12 वी नापास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील करिअरच्या काही उत्तम संधी शोधल्या आहेत.
इंजिनियरिंग डिप्लोमा
12 वी नापास झालेले विद्यार्थी देखील इंजिनियरिंग डिप्लोमा कोर्स करू शकतात. येथे त्यांना 10 वी पासच्या मार्कशीटवर देखील काही ठराविक डिप्लोमा कोर्ससाठी एडमिशन मिळवता येते.
कॉम्पुटर कोर्स
जर तुम्हाला डिप्लोमा कोर्स करण्यात काही रस नसेल तर तुमच्यासाठी कॉम्पुटरचे विविध कोर्स देखील उपलब्ध आहेत. यामध्ये वीडियो एडिटिंगपासून एचटीएमएल, ड्रीमव्यूअर, मोबाइल कोर्स, नेटवर्किंग आणि हार्डवेयर सारखे अनेक कोर्सचे पर्याय आहेत. हे कोर्स करून भविष्यात तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.
सरकारी नोकरी
हताश किंवा निराश होण्याची गरज नाही तुम्हाला सरकारी नोकरीचा देखील पर्याय आहे. शासनामार्फत 10 वी पास विद्यार्थ्यासाठी देखील सरकारी नोकरी निघत असते. त्यामुळे तुम्ही 10वी पासावर विशिष्ट भरतीचे फॉर्म भरू शकता.
या व्यतिरिक्त तुम्ही ड्रायव्हींग, स्विमिंग, जीम ट्रेनर, कराटे मुलींसाठी पार्लर अशा विविध क्षेत्रातील माहिती मिळवून त्यातून बक्कळ पैसे कमवू शकता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.