Eknath Khadse: महाजनांना खडसे नावाचा कावीळ झालाय; आमदार एकनाथ खडसे भडकले

महाजनांना खडसे नावाचा कावीळ झालाय; आमदार एकनाथ खडसे भडकले
Eknath Khadse Girish Mahajan
Eknath Khadse Girish MahajanSaam tv

जळगाव : गिरीश महाजन यांना दिवस- रात्र फक्त एकनाथ खडसेच दिसतात. यामुळे असे वाटतेय की महाजनांना (Jalgaon News) खडसे नावाचा कावीळ झाला आहे; अशा शब्‍दात आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गिरीश महाजन यांच्‍यावर निशाणा साधला आहे. (Tajya Batmya)

Eknath Khadse Girish Mahajan
Navapur News: जीव धोक्यात टाकून गॅस वाहनात भरण्याचा प्रकार; पोलीसांच्या छाप्यात ४० गॅस सिलिंडर जप्त

जळगाव दूध फेडरेशन गैरव्यवहार बाबत येत्या दोन ते तीन दिवसात मंदाकिनी खडसे व खडसे संचालकांवर गुन्हे दाखल होणार असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले. त्यावर प्रतिक्रीया देताना एकनाथ खडसे हे भडकले आहेत.

Eknath Khadse Girish Mahajan
Jalna News: सासरवाडीत येऊन जवायाकडून सासऱ्यावर गोळीबार; सासऱ्याचा जागीच मृत्‍यू

खडसे यांनी सांगितले, की दूध फेडरेशनमध्ये जर (Girish Mahajan) गैरव्यवहार असेल तर मी स्वतःच या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. मात्र मी केलेल्या तक्रारीची राजकीय दबावापोटी पोलिसात नोंद झालेली नाही. हायकोर्टाच्या माध्यमातून गैरव्यवहार करणाऱ्यांना मी दिलेल्या तक्रारीवरून नोटीस देखील बजविण्यात आली आहे. फेडरेशनमध्ये माजी संचालक जर दोषी असेल तर गिरीश महाजन यांच्या ते अत्यंत जवळचे आहेत. जो कोणी दोषी असेल त्याला शासन झाले पाहिजे. मात्र सत्तेचा माज यांना आला असल्‍याचे खडसे म्‍हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com