Latur News: आई करते मजुरी, पितृछत्र हरपलेले; जिद्दी पृथ्‍वीराज इस्रो सहलीला

आई करते मजुरी, पितृछत्र हरपलेले; जिद्दी पृथ्‍वीराज इस्रो सहलीला
Latur News
Latur NewsSaam tv

लातूर : लातूर जिल्ह्यातील निटूर येथील पृथ्वीराज सोमवंशी याचे इस्त्रोसाठी जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षा (Latur News) मधून निवड झाली आहे. वडिलांचे छत्र हरवलेल्या आठवी शिकणाऱ्या पृथ्वीराजची आई मजुरी करून त्याचे संगोपन करते. निटूर सारख्या गावखेड्यातील (ISRO) इस्त्रोचे वेड असणाऱ्या पृथ्वीराजला आता प्रत्यक्ष सफर होणार आहे. (Latest Marathi News)

Latur News
Aniksha Jaisinghani Case: अनीक्षा जयसिंघानी प्रकरणात मोठी अपडेट! पोलिसांनी घेतली शरद पवार, उद्धव ठाकरेंची नावं

इच्छाशक्तीच्या बळावर जग जिंकता येते, हे अनेकांनी सिध्द करून दाखवल आहे. लातूर जिल्ह्यातील निटूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये (ZP School) शिकणाऱ्या पृथ्वीराजने देखील सिध्द करून दाखवल आहे. वडिलांचे छत्र हरवले असल्याने पृथ्वीराज याच्या घरची परिस्थिती एकदम हलाखीची आहे. आई मजुरी करून त्याचे संगोपन करते. शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरवते. त्याचसोबत मनोबल वाढविण्याचे काम आई करते. यामुळे त्याचे पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.

Latur News
Pandharpur News : हेडफोन लावून गाणी ऐकणे बेतले जीवावर; रेल्वेच्या धडकेत युवक ठार

परीक्षेत मिळविले यश

निलंगा तालुक्यातील निटूर येथील जिल्हा परिषद प्रशालेचा विद्यार्थी पृथ्वीराज तानाजी सोमवंशी याची अंतरिक्ष केंद्राच्या वतीने श्रीहरीकोटा आंध्रप्रदेश येथील शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे. ही सहल हवाई सफर जिल्हास्तरीय असल्याने त्याची निवड झाली आहे. ही परीक्षा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद लातूर यांच्यावतीने ठेवण्यात आली होती. या स्पर्धा परीक्षेत जिल्हाभरातून अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्याच्यातून ३० विद्यार्थ्यांची नावे करण्यात आली आहे. पृथ्वीराज यांनी प्रचंड मेहनत घेत अभ्यास करून यश मिळवले आहे. पृथ्वीराजने या यशाचे श्रेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व कुटुंबीय या सर्वांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे मी या परीक्षेत पास होऊ शकलो असे पृथ्वीराज म्हणाला.

Latur News
Sanagali Crime News: बापरे! डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला तपासून केलं मृत घोषित; भावाला राग अनावर होताच उचललं मोठं पाऊल, VIDEO

वर्ग शिक्षकांनी स्‍वीकारली जबाबदारी

पृथ्वीराज हा लहानपणापासून अंतरालाचे वेड होते. एक दिवस आपणही काहीतरी केले पाहिजे. अशी इच्छा मनाशी बाळगून होता. दरम्यान लातूर जिल्हा परिषदेच्यावतीने संधी आली. शिक्षकांच्या मदतीने त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि यश मिळवले आहे. येणाऱ्या काळामध्ये पृथ्वीराजच्या शैक्षणिक अडचणीसाठी त्याचे वर्गशिक्षक जगताप यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्या कायम पृथ्वीराजच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही बोलताना जगताप यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com