बीड-पिंपळनेर-नाथापूर रस्ता करा अन्यथा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार!

बीडमध्ये रस्त्याच्या मागणीसाठी तरुण आक्रमक; रस्ता होईपर्यंत आता माघार नाही म्हणत दिला संतप्त इशारा..
बीड-पिंपळनेर-नाथापूर रस्ता करा अन्यथा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार!
बीड-पिंपळनेर-नाथापूर रस्ता करा अन्यथा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार!विनोद जिरे

बीड : गेल्या अनेक वर्षांपासून बीड-पिंपळनेर-नाथापूर रस्त्याची दयनीय अवस्था झालीय. यामुळं या खड्डेमय रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. खड्डा चुकवतांना अनेक अपघात होऊन बळी देखील गेले आहेत. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील उपस्थित झालाय. मान, पाठ, कंबर, मणक्याच्या आजाराने शेकडो नागरिक ग्रासले आहेत.

हे देखील पहा :

मात्र, याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यामुळं खांडे पारगाव, म्हाळसापूर, पिंपळगाव, जवळा, नागापूर,उमरद, पिंपळनेर, इट, बेलवाडी, बाभळवाडी, बऱ्हाणपूर, सुर्डी, नाथापूर, आडगाव, गुंधा, वडगाव आदी गावातील शेकडो तरुण आता आक्रमक झाले आहेत.

बीड-पिंपळनेर-नाथापूर रस्ता करा अन्यथा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार!
Viral Video : राजस्थानमध्ये महिलेच्या अंगावर JCB चढवून ठार मारण्याचा प्रयत्न!

गेल्या 4 वर्षांपासून प्रलंबित असणारा हा रस्ता व्हावा, यासाठी आज उमरद येथे बैठक घेतलीय. यामध्ये हा जर रस्ता झाला नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय, शेकडो तरुणांनी एकमताने घेतलाय. दरम्यान येणाऱ्या मंगळवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्याची मागणी घेऊन मोठं आंदोलन देखील करण्यात येणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com