Cyber Crime: सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; बनावट लेटरहेड पाठवून फसवणूक

सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; बनावट लेटरहेड पाठवून फसवणूक
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv

नागपूर : व्‍हॉट्सॲपवर अनोळखी नंबर वरून सरकारी लेटरहेडवर वीज कनेक्शन रात्रीपासून कट होणार असल्याचा (Cyber Crime) मेसेज आला. तर सावध व्हा. कारण या लेटरहेड विश्वास ठेवून संपर्क साधला; तर तुमच्या खात्यातील रक्कम सेकंदात होऊ शकतो. (Nagpur) नागपूरात असे प्रकार झाल्‍याचे समोर आले आहे. (Live marathi News)

Cyber Crime
MSRTC Bus News: ‘एसटी’ची सवलत भारी; ५० टक्के सवलतीने वाढले तिप्पट महिला प्रवासी

महावितरण किंवा कुठलाही सरकारी विभागातून अशा प्रकारे वॉट्सऍप वर मेसेज करत नाही किंवा मागवत नाही. अनेकजण अशा प्रकारच्या पत्राकडे दुर्लक्ष करण्याऐवजी कुतूहलाने किंवा भीतीपोटी यावर क्लिक करतात आणि सेकंदात लाखो रुपये गमवतात. सायबर हल्लेखोर हायटेक झाले असून आधी टेक्स्ट मेसेज करून लुबाडणूक करण्याचा फंडा त्यांनी बदलला आहे. अगदी सरकारी कागदाप्रमाणे हुबेहूब दिसणारे लेटरहेड तयार करून त्यात अधिकाऱ्यांची सही आणि शिक्का देखील या गुन्हेगारांनी तयार केले आहेत. त्यामुळे प्रथम दर्शनी ते पत्र खरे असल्याचा भास होतो. नागपूरात अनेक लोकांना वेगवेगळा नंबरवरून अशा प्रकारचे पत्र पाठविण्यात आले असून अनेकांची यातून फसवणूक झाली.

Cyber Crime
Kalyan News: पादचारी पुलावर पहाटे मारहाण करत लुटमार; कल्याण रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना, व्हिडिओ आला समोर

मागील काही दिवसांपासून विविध ग्राहकांना बनावट पत्र पाठवून लुवाडण्याचे प्रकार होत आहेत. यात वीज ग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट पत्र पाठवून वीज बिल अपडेट करायला सांगितले जाते. त्यानंतर ग्राहकांनी संबंधित क्रमांकावर संपर्क केल्यावर महावितरणचा अधिकारी असल्याचे दाखवून बोगस लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करायला सांगत बँक खात्यातून रक्‍कम दुसरीकडे वळती करण्यात येते. मागील महिन्याभरातच यासंदर्भात अनेक गुन्हे नोंदविल्या गेले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com