Nashik Crime News: नाशिक बाजार समिती निवडणुकीत राजकारण तापलं, काँग्रेसच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी!

Latest News: या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यामध्ये (Nashik Police) दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Election
Nashik Krushi Utpanna Bazar Samiti ElectionSaam Tv

Nashik News: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत (Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Election) माघार घेतल्यानंतर आता राजकारण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीवरुन आता थेट काँग्रेसच्या आमदाराला (Congress MLA) जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यामध्ये (Nashik Police) दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Election
Tamilnadu 4 Days Duty Bill: आता 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी! विधेयक मंजूर, कामाचे तास मात्र वाढणार

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी दरम्यान इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर (Congress MLA Hiraman Khoskar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हिरामण खोसकर यांना धमकीचा फोन आला होता. विरोधी पॅनलचा प्रचार करत असल्याच्या कारणावरुन त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. शिवाजी चुंभळे आणि अजिंक्य चुंभळे यांनी फोनवरून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Election
Sanjay Raut On Eknath Shinde: 'अनेक जण लायकी नसतानाही मुख्यमंत्री होतात...', संजय राऊतांचा एकनाथ शिंदेवर घणाघात!

धमकीच्या फोनमुळे हिरामण खोसकर आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. धमकीच्या फोनवरुन घाबरलले आमदार हिरामण खोसकर यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'माझं काहीही बर वाईट होऊ शकतं, निवडणुकीतून माघार घेऊन शेती करेन.' याप्रकरणी आमदार खोसकर यांनी शिवाजी चुंभळे आणि अजिंक्य चुंभळे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Election
Good News: देशाच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ, नऊ महिन्यांचा गाठला उच्चांक

दरम्यान, 'आम्ही खोसकरांना कोणतीही धमकी दिली नाही', असा दावा शिवाजी चुंभळे यांनी केला आहे. खोसकरांनी धमकी दिल्याचे पुरावे द्यावेत असे देखील शिवाजी चुंभळे यांनी सांगितले. बाजारसमिती निवडणुकीत आमच्या पॅनलचे पारडं जड असल्याने बदनाम करण्यासाठी खोसकरांकडून आमच्यावर हे आरोप केले जात असल्याचे मत चुंभळे यांनी व्यक्त केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com