Nashik News: तलवार घेवून रिल्‍सचा व्हिडिओ सोशल मीडियावर; तरूणाला चांगलेच पडले महागात

तलवार घेवून रिल्‍सचा व्हिडिओ सोशल मीडियावर; तरूणाला चांगलेच पडले महागात
Nashik News
Nashik NewsSaam tv

तबरेज शेख

नाशिक : सोशल मिडीयावर रिल्स बनवणे नाशिकमध्ये एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. हातात तलवार घेवून चित्रपटातील गितावर रिल्‍स तयार केले. हा व्‍हीडीओ व्‍हायरल झाल्‍यानंतर (Police) पोलिसांपर्यंत पोहचला. यानंतर संबंधीत युवकाला पोलिसांनी ताब्‍यात घेतले. (Tajya Batmya)

Nashik News
Sangli News: कॅरम क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा; छापा टाकत १० जण ताब्यात

सोशल मिडीयाचे भूत डोक्यावर चढलेल्या नाशिकमधील एका तरुणाने हातात तलवार घेऊन हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर रिल्स बनवले. हा व्हिडिओ नाशिकच्या गुन्हे शाखेच्या हाती लागला. मग काय सोशल मिडीयावर तलवार घेऊन रिल्स बनवणाऱ्या त्या तरुणाचे सोशल मीडियाचे डोक्यावर चढलेले भूत पोलीसांनी उतरवले.

पोलिसांनी घेतला शोध

भारत नगर येथे राहणारा १९ वर्षीय संशयित फैजान नईम शेख याने हातात तलवार घेऊन त्याचा रिल्स बनवत हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) अपलोड केला. व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी माहिती काढत भारतनगर इथे राहणाऱ्या फैजान शेखचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेत त्याकडून एक तलवार हस्तगत केली.

अन्‍य दुसराही ताब्‍यात

तलवारबाबत अधिक चौकशी केली असता त्याने ही तलवार भारतनगर येथेच राहणारा संशयित सचिन शरद इंगोले याच्याकडून घेतल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी सचिन इंगोले याला देखील ताब्यात घेत त्याकडून एक गुप्ती जप्त केली असल्याची माहिती नाशिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी यांनी दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com