Chandrapur News: एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, अंगावर वीज कोसळून एकाचा मृत्यू, घटनेचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Latest News: चंद्रपूर जिल्ह्यातल्या वकोली खाण परिसरात ही घटना घडली.
Chandrapur News
Chandrapur News Saam Tv

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये (Chandrapur) अंगावर वीज कोसळून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वीज (lightning) कोसळल्यामुळे कोळसा खाण कामगाराचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वकोली खाण परिसरात ही घटना घडली. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Chandrapur News
Nashik Crime News: सोशल मीडियावरवर लाईव्ह येत शिवीगाळ; वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मित्राचाच खून

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. याचदरम्यान अंगावर वीज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वेकोली खाण परिसरात एका कामगाराच्या अंगावर वीज कोसळली. क्षणातच होत्याचे नव्हते झाले. अंगावर वीज कोसळल्यामुळे या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

अंगावर वीज कोसळल्यामुळे खाणकाम कामगार बाबू धनकुमार महेंद्र सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. बाबू सिंह मंगळवारी दुपारी कामावर जात होते. त्याचवेळी ओसी टु नागलोण खाण परिसरात त्यांच्या अंगावर वीज कोसळली. बाबू सिंह वेकोलीच्या माजरी क्षेत्रातील नागलोन खाण परिसरातील के.जी. सिंग कंपनीत कामाला होते. ते ओव्हर बर्डनची वाहतुक करण्याचे काम करायचे. बाबू सिंह हे मुळचे बिहारचे राहणारे होते. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले आहे.

Chandrapur News
Pune Accident News: डंपरची बाईकला जोरदार धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू; अपघात CCTV कॅमेऱ्यात कैद

दरम्यान, गडचिरोलीमध्ये सोमवारी अंगावर वीज कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. लग्न कार्यक्रम आटोपून गावाकडे परत जात असताना झाडाखाली थांबलेल्या पती-पत्नी आणि दोन मुलांवर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील तुळशी फाटा येथे ही घटना घडली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com