Shivshahi Bus Accident : पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात; 13 प्रवासी जखमी, VIDEO

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.
Shivshahi Bus Major Accident in Pune Chhatrapati sambhaji nagar Road
Shivshahi Bus Major Accident in Pune Chhatrapati sambhaji nagar Road Saam TV

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

Shivshahi Bus Accident News : छत्रपती संभाजीनगर शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. शहरातील वाळूज परिसरात शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला बसने जोरदार धडक दिली. या घटनेत बसचालक गंभीर जखमी झाला आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Shivshahi Bus Major Accident in Pune Chhatrapati sambhaji nagar Road
Shivshahi Bus Fire : धावत्या शिवशाही बसला भीषण आग, १६ प्रवासी थोडक्यात बचावले; थरकाप उडवणारा VIDEO

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसमधील ३५ प्रवाशांपैकी १३ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. विशेष बाब म्हणजे शिवशाही बसचा अपघात होण्याची आजची ही दुसरी घटना आहे. पहिली घटना दुपारच्या सुमारास शिर्डी मार्गावर घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून प्रवाशांना घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने ही बस येत होती. यावेळी बस वाळूज परिसरात आल्यानंतर समोरून जात असलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला बसने जोरदार धडक दिली. (Breaking Marathi News)

ही धडक (Accident) इतकी भीषण होती की, बसचा समोरील भागाचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात बसचालक गंभीर जखमी झाला. तर बसमधील ३५ प्रवाशांपैकी १३ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

लोणीत शिवशाही बस स्कूल बसला धडकली

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस स्कूल बसला धडकल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात घडली. या अपघातात ४ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोणी बाभळेश्वर रोडवर छत्रपती चौकात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com