Maharashtra Politics : डॉ. सुधीर तांबे यांच्या वक्तव्याने संभ्रम कायम; म्हणाले, 'सस्पेन्स मुव्ही आहे'...

पत्रकारांशी संवाद साधताना 'सस्पेन्स मुव्हीआहे', असं विधान डॉ. सुधीर तांबे यांनी केलं आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politics Saam TV

सचिन बनसोडे

Maharashtra Politics : नाशिक पदवीधर मतदार संघात डॉ. सुधीर तांबे आज गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे. अशात सस्पेन्स संपला असे म्हणत असतानाच हा सस्पेन्स आणखी वाढला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना 'सस्पेन्स मुव्हीआहे', असं विधान डॉ. सुधीर तांबे यांनी केलं आहे. त्यामुळे याबाबात आणखीनच संभ्रम निर्माण झाला आहे. (Latest Maharashtra Politics News)

नाशिक पदवीधर मतदारसंघात निवडणुकीसाठी अर्ज करण्यासाठी आता फक्त १ दिवस शिल्लक आहे. अशात नुकतीच सुधीर तांबे यांनी ही माहिती दिल्याने भाजपमध्ये थोडा गोंधळ सुरू असल्याचे म्हटले जात आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, " नाशिक पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेसच्या वतीने उद्या उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. अतिशय साध्या पध्दतीने हा उमेदवारी अर्ज भरणार असल्याने कुणीही गर्दी करु नये. लवकरच सर्व नेत्यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा आयोजित करणार असून यात आपण सर्व निमंत्रित आहात."

नाशिक पदवीधर निवडणूकीसाठी काँग्रेसकडून पुन्हा मीच उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्वतः डॉ. सुधीर तांबे यांनी संगमनेरहून नाशिककडे रवाना होण्यापूर्वी जाहीर केलं. मात्र दुसरीकडे भाजपकडून उमेदवारीसाठी चर्चेत असलेले डॉ. तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांच्याबद्दल सस्पेन्स कायम आहे.

सत्यजित तांबे भाजपचे की, काँग्रेसचे उमेदवार, याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यातच संगमनेर येथे स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित अभिवादन कार्यक्रमासाठी तांबे पिता-पुत्र एकत्र आले होते. यावेळी नाशिककडे रवाना होताना प्रसार माध्यमांच्या कॅमेराकडे बघत डॉ. सुधीर तांबे यांनी 'सस्पेन्स मोव्ही आहे' असे वक्तव्य केल्याने तांबे पिता-पुत्रांच्या मनात नेमकं काय चाललंय याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Legislative Council Elections : सत्यजीत तांबेंना उमेदवारी ? भाजपात खदखद वाढली, अर्ज भरण्यासाठी नेता रवाना

उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरून गेले ५ ते ६ दिवस कॉंग्रेसमध्ये दोन नावांची जोरदार चर्चा सुरू होती. कॉंग्रेसकडून डॉ.सुधीर तांबे अर्ज दाखल करणार की त्यांचे पुत्र सत्यजित तांबे रिंगणात येणार अशी चर्चा सुरू होती. अशात आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. मात्र अजूनही भाजपने आपला नाशिकमधील उमेदवार जाहीर केला नाही.

Maharashtra Politics
Sudhir Mungantiwar on Congress : सुधीर मुनगंटीवारांचा काँग्रेसवर हल्लाबोल, पाहा सविस्तर बातमी

नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळला जातो. यात पदवीधर मतदारसंघाची निर्मीती झाल्यापासून भाजपचाच बालेकील्ला राहिला आहे. अशात कॉग्रेंसला देखील नाशिकसाठी तगडा उमेदवार हवा हेता. त्यामुळे विजयाची हॅट्रिक करणाऱ्या आमदार डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारासाठी निवड झाली आहे. तर भाजप अदयाप आपला उमेदवार शोधत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com