Kannad Crime News: 30 वर्षीय तरुणाचं अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक कृत्य; बापाला कळताच झाला 'गेम'

Boy Killed By Girl Father: याप्रकरणी पोलिसांनी (Chhatrapati Sambhajinagar Police) आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar CrimeSaam Tv

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाची डोक्यात फावडा घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील जेवखेडा बुद्रुक येथे ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी (Chhatrapati Sambhajinagar Police) आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Nagpur Shocking Video: 29 सेकंदात 19 वार भरदिवसा पेट्रोल पंप मालकाची हत्या; भयानक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

मिळालेल्या माहितिनुसार, एका 30 वर्षीय तरुणाने 17 वर्षांच्या मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या तरुणाने या मुलीचे तोंड ओढणीने दाबून पत्र्याच्या शेडमध्ये नेत तिच्यावर बळजबरी केली. मुलीने आरडाओरड केल्याने जवळच असलेल्या आई-वडिलांनी घटनास्थळी धावून घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीची नराधमाच्या ताब्यातून सुटका केली.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Khopoli Accident News: भाजी खरेदीसाठी गेलेल्या पती-पत्नीची ताटातूट; भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू

यावेळी आपल्या मुलीची अवस्था पाहून बापाचा राग अनावर झाला. त्यांने रागाच्या भरात आपल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात फावडा घातला. जवखेडा बुद्रुक येथे सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तात्काळ छत्रपती संभाजीनगरला घाटी रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा उपचारादरम्यान रात्री नऊच्या सुमारास मृत्यू झाला.

तरुणाच्या हत्येप्रकरणी पिशोर पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयामध्ये हजर केले. न्यायालयाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या भयंकर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com