Pune News: पुण्याच्या खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलींचा बुडून मृत्यू, 7 जणींना वाचवण्यात यश

Khadakwasla Dam: स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचवण्यामध्ये यश आले आहे.
Khadakwasla Dam News
Khadakwasla Dam NewsSaam Tv

ज्ञानेश्वर चौतमल, पुणे

Pune Latest News: पुण्यातल्या (Pune) खडकवासला धरणामध्ये (Khadakwasla Dam) पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचवण्यामध्ये यश आले आहे. खडकवासला परिसरातील गोऱ्हे खुर्द येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी दोन्ही मुलींचे मृतदेह धरणाच्या बाहेर काढले.

Khadakwasla Dam News
Mumbai Pune Expressway: मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू; एयर बॅग उघडूनही...

मिळालेल्या माहितीनुसार, गोऱ्हे खुर्द गावाच्या हद्दीत कलमाडी फार्म हाऊसजवळ खडकवासला धरणामध्ये पोहण्यासाठी 9 मुली उतरल्या होत्या. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास या मुली पाण्यामध्ये उतरल्या. पण पाण्याचा अंदाज न आल्याने या सर्व मुली पाण्यामध्ये बुडू लागल्या. धरणाच्या काठाजवळ दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांना या मुली बुडत असल्याचे दिसले. प्रसंगावधान राखत स्थानिकांनी धरणामध्ये उड्या मारत सात जणींचे प्राण वाचवले.

स्थानिकांनी सातर मुलींना सुखरुप बाहेर काढले. पण दोन मुली धरणामध्ये बुडाल्या. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या दोन मुलींचा शोध घेत त्यांचा मृतदेह धरणाबाहेर काढला. या दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Khadakwasla Dam News
Andhra Pradesh Accident: आंध्रप्रदेशमध्ये रिक्षा- बसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 7 महिलांचा जागीच मृत्यू

या सर्व मुलींचे अंदाजे वय 16 ते 17 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. या सर्न मुली बुलडाणा जिल्ह्यातल्या आहेत. पुण्यातील गोरे खुर्द गावात त्यांच्या नातेवाईकाकडे बारशाच्या कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. खडकवासला धरणामध्ये या सर्व मुली पोहण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली. खुशी संजय खुर्दे ( 14 वर्षे) आणि शीतल भगवान टिटोरे (15 वर्षे) अशी या मृत मुलींची नावं आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com