A.R. Rahman Concert: ए आर रहमान गात होता गाणं, अचानक पोलिसांनी स्टेजवर एन्ट्री करत शो पाडला बंद

Pune Police Stops A. R. Rahman Concert: 10 वाजल्यानंतरही हा शो सुरु असल्यामुळे पोलिसांनी (Pune Police) ही कारवाई केली आहे.
AR Rahman Concert
AR Rahman ConcertSaam Tv

Pune News: प्रसिद्ध संगीतकार ए. आर रहमानचे कॉन्सर्ट (AR Rahman Concert) पुणे पोलिसांनी बंद पाडले आहे. ए आर रहमान गात असतानाच पुणे पोलिसांनी स्टेजवर एन्ट्री मारली आणि हा शो बंद पाडला. 10 वाजल्यानंतरही हा शो सुरु असल्यामुळे पोलिसांनी (Pune Police) ही कारवाई केली आहे. याचा व्हिडिओ सध्या समोर आला असून तो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

AR Rahman Concert
Pune Covid Center Scam Case: पुणे जम्बो कोविड सेंटर भ्रष्टाचार प्रकरणी राजू साळुंखेंना अटक, किरीट सोमय्यांनी ट्वीट करत सांगितले...

पुण्यामध्ये रविवारी प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांचे कॉन्सर्ट पार पडले. या कॉन्सर्टला पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या शोमध्ये ए. आर रहमान यांनी वेगवेगळी गाणी गात पुणेकरांचे चांगलेच मनोरंजन केले. पण हा शो सुरु असतानाच पुणे पोलिसांनी तो बंद पाडला. ए आर रहमान गात असताना पुणे पोलिसांनी स्टेजवर एन्ट्री केली आणि शो बंद पाडला. 10 वाजल्यानंतरही ए. आर रहमान यांचा शो सुरु होता त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली.

दहा वाजल्यानंतरही शो सुरु असल्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी स्टेजवर जाऊन ए. आर रहमान यांना गाणं थांबवण्यास भाग पाडले. इतकच नाही तर '10 वाजल्यानंतरही तुम्ही कसे गाऊ शकता', असे म्हणत ए आर रहमान यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी तोंडावरच सुनावले. पुण्यातील राजाबहादुर मिल परिसरात रविवारी रात्री या शोचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.

AR Rahman Concert
Pune Online Fraud: ऑनलाईन टास्क पडला महागात! पुण्यात इंजिनियर महिलेला घातला ३८ लाखांचा गंडा; टेलिग्राम पेजवरुन...

महत्वाचे म्हणजे ए आर रहमानच्या शोला पुणे पोलिस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांसह हजेरी लावली होती. परंतु 10 वाजल्यानंतरही शो सुरूच ठेवल्याने चक्क स्टेजवरच जाऊन पुणे पोलिसांनी शो बंद पाडला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर ए आर रहमान स्टेजच्या पाठीमागे निघून गेले. याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com