शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मौसमदीन मेव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात Saam Tv

शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणाऱ्या आरोपीला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे. मौसमदीन मेव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदार आमदार यांना २० ऑक्टोबरच्या रात्री एक संदेश आला होता. हा संदेश मौसमदीन नावाच्या व्यक्तीने एक महिला बनून पाठवला होता.

हे देखील पहा -

तक्रारदार यांनी प्रतिसाद देताच पुढे दोघांमध्ये संभाषण सुरु झाले. चँटद्वारे या व्यक्तीने आमदाराकडे मदत मागितली. त्यानुसार आमदार साहेबांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. काही वेळाने आमदारांना एका महिलेचा व्हिडिओ कॉल आला. महिलेने आमदारांशी बोलून मदतीबाबत चर्चा केली.

फोन कट होताच आमदारांच्या मोबाइलवर एक व्हिडिओ पाठवण्यात आला. आरोपींनी आमदाराचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांना अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पोलीस पुत्राच्या खुनाचा 12 तासात उलगडा; 3 आरोपींना बेड्या

या प्रकरणी आमदाराने मुंबईत पोलिसांत तक्रार दिली, त्यानंतर आरोपीचा राजस्थानच्या भरतपूर येथे शोध लागला. भरतपूर येथील सिकारी पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीला त्याच्या गावातून अटक केली आहे. लवकरत या आरोपीचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिला जाणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com