Railway: प्रवाशांना दिलासा! प्लॅटफॉर्म तिकिटाच्या शुल्कात मोठी कपात

कोरोना काळामध्ये महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवरील गर्दी टाळण्याकरिता प्लॅटफॉर्म तिकीटच्या शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आली
Railway: प्रवाशांना दिलासा! प्लॅटफॉर्म तिकिटाच्या शुल्कात मोठी कपात
Railway: प्रवाशांना दिलासा! प्लॅटफॉर्म तिकिटाच्या शुल्कात मोठी कपातSaam Tv

मुंबई : कोरोना काळामध्ये महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवरील गर्दी टाळण्याकरिता प्लॅटफॉर्म तिकीटच्या शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आली होती. यामुळे सीएसएमटी, दादर, ठाणे, एलटीटी, कल्याण आणि पनवेल या स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीटकरिता ५० रुपये मोजावे लागत होते.

हे देखील पहा-

मात्र, आता सर्व निर्बंध शिथिल झाल्यावर मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे. यासंदर्भात निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, एलटीटी, कल्याण आणि पनवेल या स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीटकरिता ५० रुपयांऐवजी आता केवळ १० रुपये मोजावे लागणार आहे. प्लॅटफॉर्म तिकिटामधील ही कपात आजपासून २५ नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com