
सचिन गाड, मुंबई
Mumbai News: मुंबईवर पुन्हा हल्ल्याचे सावट आहे. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) धमकीचे फोन कॉल येणं किंवा ई-मेल येणं सुरुच आहे. आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांना नुकताच एक धमकीचे ट्वीट मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. यावेळी मुंबई पोलिसांना फोन किंवा इमेलद्वारे मुंबई हल्ल्याच्या धमकीची (Mumbai Blast Threat Call) माहिती मिळाली नाही. तर ट्विटरवरुन ही धमकी देण्यात आली आहे. या ट्वीटनंतर मुंबई पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. (Mumbai News Today)
मुंबई पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून मुंबईत बॉम्बस्फोट करण्याबाबतची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटवर सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एका अकाऊटवरून 'i m gonna blast the mumbai very soon' असा इंग्रजी भाषेत धमकीचा मेसेज पाठवण्यात आला होता. 'मी लवकरच मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करणार आहे.', अशाप्रकारचा हा मेसेज आला आहे.
या धमकीच्या मेसेजची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबधित अकऊंटची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. मुंबईत बॉम्बस्फोट करण्याच्या या धमकीच्या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस सतर्क झाले आहे. हा मेसेज नेमका कोणी पाठवला त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांना एकदा एका अज्ञात इसमाकडून अफवेचा (Rumor) फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने हाजीअली येथे 17 अतिरेकी येणार असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नव्हती. पोलिसांनी (Mumbai Police) त्या नंबरवर पुन्हा फोन केला असता त्याचा फोन बंद येत होता. संबधित फोन हा उल्हासनगरहून आला असल्याचे तपासात समोर आले होते.
मुंबईवर 26/11 सारखा हल्ला करू असा धमकीचा मॅसेज (Threat) मुंबई पोलिसांना मागच्या वर्षी ऑगस्ट महिल्यात मिळाला होता. कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी नंबरवरून हा मॅसेज आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी विरारमधून एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली होती. या व्यक्तीची चौकशी महाराष्ट्र एटीएस आणि गुन्हे शाखेचे पथकांकडून चौकशी करण्यात आली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.