Pune Crime News: पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ; शहरात गुंडाच्या दहशतीमुळे नागरिक आणि व्यापारी हैराण

गुंडाच्या कृत्यामुळे पुण्यातील नागरिक आणि व्यापारी दहशतीखाली आहे.
pune crime news
pune crime news Saam TV

सचिन जाधव

Pune Crime News : पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता बाळगून मध्यवर्ती भागात दहशत माजवण्याचे कृत्य सर्रास सुरू आहे.अशाच एका भयानक घटनेचा व्हिडिओ आज समोर आला. गुंडाच्या कृत्यामुळे पुण्यातील नागरिक आणि व्यापारी दहशतीखाली आहे. (Latest Marathi News)

pune crime news
Crime: भोसरीत कोयता गँगचा दाेघांवर हल्ला; १८ जणांवर खूनाचा गुन्हा दाखल

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन तरुण हातात कोयते घेऊन दहशत मजावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. काल या दोन तरुणांनी हातात चाकू सूरे घेऊन परिसरातील दुकानांमध्ये जाऊन अनेक लोकांना त्यांनी त्यांच्या हातातील शस्त्रांनी भोसकले. रस्त्यात जो दिसेल त्याला चाकू दाखवून भीती दाखवत होते. अगोदर पुणे शहराच्या ग्रामीण भागात कोयता गँगची दहशत होती, ती आता शहरात पोहचली आहे.

हातात कोयते,चाकू घेऊन फिरणारे तरुण मुलं आहेत. हे एखाद्या सिनेमातील दृश्यापेक्षा कमी नाही. सगळं घडतय पुण्यात... पुण्यातील भारती विद्यापीठ हडपसर,कात्रज,कोंढवा,मुंढवा या सारख्या अनेक भागात ही कोयता गँग म्हणून सक्रिय आहेत.

या गँगचे पोर कोयता,तलवार,यासारखे हत्यार घेऊन या भागात असणाऱ्या दुकानात जाऊन व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करतात. पैसे दिले नाहीत तर दुकानाची करून जिवे मारून टाकू अशी धमकी देतात. या कोयता गँगमुळे या भागांमध्ये नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

गेल्या एक ते दोन वर्षांपासून ही गॅंग शहरातील उपनगरांमध्ये जाऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम करतेय. विशेष म्हणजे या गॅंग मध्ये अनेक अल्पवयीन मुलांचा करण्यात येतोय. हडपसर मधील या कोयता गँग चा मागील वर्षीचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे.

या स्थानिकांनी अनेक वेळा पोलिसात तक्रार देखील दिली होती मात्र पोलिसांकडून कुठल्याच प्रकारची दखल घेतली जात नसल्यामुळे हडपसर मांजरी या भागातील स्थानिकांनी थेट हडपसर पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढला होता.

या कोयता गॅंगमुळे स्थानिक नागरिक तसेच व्यापारी देखील हैराण झाले आहेत. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यातील कोयता गॅंगचा प्रश्न उपस्थितीत करत कोयता गँगवर कठोर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थितीत केला होता. कोयता गँगची दहशतखाली आता व्यापारीही आले आहेत.

pune crime news
Video : कोयता गँगचा धुमाकूळ, रेडीमेड कपड्यांच्या दुकानात लूट

हा प्रकार इतका गंभीर आहे की खासदार अमोल कोल्हे यांनी याबद्दलच निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.

या अधिवेशनात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील याबाबत कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली. आता पुण्याचा कारभार नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे आहे. कोयता गँगच्या मुसक्या नवीन पोलीस आयुक्त आवळणार का याकडेच सगळ्याच लक्ष आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com