Nana Patole On Sanjay Raut: 'संजय राऊतांनी चोमडेपणा बंद करावा', नाना पटोलेंनी लगावला टोला

Latest News: संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन देखील नाना पटोले यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
Nana Patole - Sanjay Raut
Nana Patole - Sanjay RautSaam Tv

Mumbai News: 'मी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) वकील आहे', असे म्हणणाऱ्या संजय राऊतांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. 'संजय राऊतांनी चोमडेपणा बंद करावा.', असा टोला नाना पटोले (Nana Patole) यांनी लगावला आहे. त्याचसोबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन देखील नाना पटोले यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Nana Patole - Sanjay Raut
NCP New Chief : राष्ट्रवादीचं ठरलं? सुप्रिया सुळे नव्या अध्यक्षा होण्याची दाट शक्यता, भुजबळांनीही दिले संकेत

संजय राऊतांना दिला इशारा -

संजय राऊत यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधत असे म्हटले आहे की, 'संजय राऊत यांनी चोमडेपणा बंद केला पाहिजे. उद्धव ठाकरे निर्णय घेत नाही. संजय राऊत घेतील असं म्हटलं जाईल का? मी वारंवार सांगितले आमच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत नाही.' तसंच, 'मल्लिकार्जुन खर्गे हे ज्येष्ठ नेते आहेत. अशा अनुभवी व्यक्तीचा अपमान करण्याचे काम संजय राऊत हे करत असतील तर आम्ही खपवून घेणार नाही.', असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

Nana Patole - Sanjay Raut
Political News : शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत राजकीय हालचालींना वेग, सुप्रिया सुळेंचा कर्नाटक दौरा रद्द

आम्ही सत्तेच्या वाटेत नव्हतो -

पहाटेच्या सरकार देखील नाना पटोले यांनी टीका केली आहे. 'महाविकास आघाडी होत असताना कोण कशा पद्धतीने वागत होते हे मी आत्ताच सांगणार नाही. पहाटेचं सरकार पडल्यावर देश बघत होता. आम्ही यांच्या सत्तेच्या वाटेत नव्हतो. पहाटेच्या नव्हतो आणि कुठल्याच नव्हतोच. कॉमन मिनिमन प्रोग्राम तयार करण्यात आला होता.'

Nana Patole - Sanjay Raut
Maharashtra Weather Update: राज्यात पुढचे 5 दिवस अवकाळी पावसाचे, या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा

पहाटेच्या सरकारवर टीका -

तसंच, 'पहाटेचे सरकार आले. राज्याला कलंक लावण्याचे काम झाले हे महाराष्ट्राने बघितले. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा कुणाचा होता. पहाटेच सरकार कुणाचं होतं हेही सरकारला माहीत आहे', असा टोला देखील नाना पटोले यांनी लगावला आहे.

दुसऱ्यांच्या घरात डोकावत नाही -

'आमच्या पक्षात लोकशाही आहे, हुकूमशाही नाही. आम्ही यांच्याकडे आलो नव्हतो तर ते आमच्याकडे आले होते. सोनिया गांधी यांच्याकडे आले होते. त्यामुळं कोणाच्या मध्यस्थीने झाले, आम्ही सत्तेसाठी नव्हतो.' असं देखील त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. तसचं, राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार यावर नाना पटोले यांनी सांगितले की, 'राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होईल यावर आम्ही बघत नाही. दुसऱ्याच्या घरात आम्ही डोकावत नाही.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com