Sanjay Raut On Maharashtra CM: आय रीपीट! महाराष्ट्राला पुन्हा नवीन मुख्यमंत्री मिळणार; संजय राऊतांनी सांगितलं कारण

Eknath Shinde Group: शिंदे गटातील वातावरणावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला.
MP Sanjay Raut
MP Sanjay Raut Saam Tv

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी बंडखोरी करत काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde- Fadnavis Government) पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची (Maharashtra Deputy CM) शपथ घेतली. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

अजित पवार युती सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यामुळे शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये वाद झाला. शिंदे गटातील या वातावरणावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधत 'लवकरच राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार' असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

MP Sanjay Raut
Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का? राज्य सहकारी बँक घोटाळ्यात कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी!

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की,'बहुमताचा 170 चा आकडा असताना देखील राष्ट्रवादीचा चाळीसचा एक गट नव्याने आणला जातो. याचा अर्थ असा आहे की तुमची गरज संपली आहे. आता तुम्ही गाशा गुंडाळा. अजित पवार यांचा शपथ होते. पण या गटाच्या बाशिंग बांधून बसलेल्या लोकांना शपथ दिली जात नाही. पुन्हा एकदा मी दावा करतो की महाराष्ट्राला पुन्हा एकदा नवीन मुख्यमंत्री मिळेल हे नक्की. ना घरका ना घाटका अशी यांची अवस्था झाली आहे. ही परिस्थिती त्यांनी स्वत:हून ओढावून घेतली आहे.'

MP Sanjay Raut
Cordelia Cruise Case: IRS समीर वानखेडेंना याचिकेत बदल करण्याची परवानगी, लाच देणाऱ्याला करणार आरोपी

'स्वाभिमान असेल आणि जुनी वक्तव्य आठवत असतील तर राजीनामे द्या. अजित पवार यांच्यामुळे आम्ही पक्ष सोडला असे बोलत होते. मांडाला मांडी लावून काय आता तुमच्या मांडीवरच बसले आहेत. त्यांना स्वाभिमान -अभिमान आहे का? त्यांच्या भांडणांमध्ये आपापसात आम्हाला पडायचं नाही ते आपापसात झुंजून संपून जातील. 90 जागा अजित पवार जर मागत असतील तर यांना काय मिळणार आहे. किती तुकडे मिळणार आहेत. यांच्याशी चर्चा देखील कोणी करणार नाही.', असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

MP Sanjay Raut
Raj Thackeray Melava In Mumbai: ठाकरे बंधू एकत्र येणार का? राज ठाकरे लवकरच भूमिका करणार जाहीर

शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये झालेल्या वादावर संजय राऊत म्हणाले की, 'त्यांच्या गटामध्ये काय सुरू आहे हे आम्ही पाहायला बसलो नाही. उद्धवजींनी एका ओळीत प्रतिक्रिया दिली होती नांदा सौख्यभरे. हीच भूमिका त्यांच्यासाठी आहे. हे अपेक्षित होतं. हा आऊटघटकेचा खेळ आहे आणि होता.' अशी टीका त्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com