
Karnataka High Court : इच्छेशिवाय ५ वर्ष शारीरिक संबंध ठेवताच येत नाही, अशी महत्वपूर्ण टिप्पणी करत कोर्टाने एका महिलेने केलेले बलात्काराचे आरोप फेटाळून लावले आहेत. लग्नाचे खरे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर काही कारणाने लग्न होऊ शकले नाही, तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. (Latest Marathi news)
एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान कर्नाटक उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे. माहितीनुसार, एका महिलेचे एका तरुणसोबत गेल्या ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यातून दोघांनी अनेकदा शारीरिक संबंध देखील ठेवले. मात्र, काही काळानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर तरुणाने या महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिला.
तरुणाने लग्नास नकार देताच महिलेने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. पीडित महिलेने आरोप केला होता, की संबंधित तरुणाने लग्नाचे अमिष दाखवून तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. गेल्या ५ वर्षांपासून हा तरुण आपल्यावर बलात्कार (Crime News) करत असल्याचा आरोपही या महिलेने केला.
दरम्यान, सोमवारी या प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने सलग ५ वर्ष महिलेच्या इच्छेशिवाय शारीरिक संबंध ठेवताच येत नाही, अशी टिप्पणी करत पीडित महिलेने केलेले आरोप फेटाळून लावले आहे.
कोर्टाने निकालात नेमकं काय म्हटलं?
न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी निकाल देताना सांगितले की, "या प्रकरणात संमती एकदा, दोनदा, तीनदा किंवा दिवस आणि महिन्यांसाठी घेतली नाही, तर वर्षानुवर्षे, पूर्ण ५ वर्षांसाठी घेतली असं दिसून येत आहे. त्यामुळे असे म्हणता येणार नाही की तरुणाने केले. महिलेच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले.
एवढा प्रदीर्घ काळ संबंध राहिल्याने आणि या काळात दोघांमध्ये निर्माण झालेले संबंध यामुळे 375 आणि 376 अन्वये गुन्हा मानता येणार नाही. IPC च्या कलम 375 मध्ये महिलेच्या संमतीविरुद्ध लैंगिक संबंध हे बलात्कार मानला जातो. त्यासाठी कलम 376 बलात्कारासाठी शिक्षा प्रदान करते. मात्र, या प्रकरणात असे दिसून येत नाही, असं म्हणत कोर्टाने पीडित महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.