Video : बाबो! तब्बल ९०,००० हजारांची चिल्लर घेऊन पठ्ठ्या गेला शोरुममध्ये; दुचाकी खरेदीचा व्हिडिओ व्हायरल

90k coins : शोरुमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने ही सर्व नाणी व्यवस्थीत मोजली.
Video
Video ANI

Assam : प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात वेगवेगळी स्वप्ने पाहत असतो. ती सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीजण आहोरात्र मेहनत करतात. एखादी दुचाकी किंवा चार चाकी खरेदी करणे सामान्य माणसासाठी मोठी गोष्ट असते. सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीची आणि त्याच्या दुचाकीची मोठी चर्चा होत आहे. (90k coins)

दुचाकी खरेदी करण्यासाठी या व्यक्तीने चक्क गोणीभर नाणी साठवलीत. ही नाणी घेऊन तो तरुण शोरुममध्ये देखील गेला आणि त्याने आपल्या आयुष्यात पहिल्यांदा पहिली दुचाकी खरेदी केली. आसाममधील या पठ्ठ्याने आणलेली नाणी पाहून शोरुममध्ये सर्वच थक्क झाले होते.

Video
Pune News : रील्स करणाऱ्या तरुणांची दुचाकी स्कुटीला धडकली; ३१ वर्षीय महिलेला गमवावा लागला जीव

तब्बल ९०,००० रुपयांची नाणी साठवली

एएनआय या वृत्त संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी यामध्ये म्हटलं आहे की, मोहम्मद सैदुल हक असं दुचाकी खरेदी केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. शोरुममधील व्यक्तींनी त्या माणसाला नाणी घेऊन आल्यानंतर कोणतीही चुकीची अथवा अपमानास्पद वागणूक दिली नाही. तिथे काम करणाऱ्या एका व्यक्तीने ही सर्व नाणी व्यवस्थीत मोजली.

शोरुम मालकाने या अनुभवाबाबत म्हटलं आहे की, मला यामुळे फार छान वाटत आहे. कोणीतरी नाणी घेऊन शोरुममध्ये आलं आहे. अशा घटना मी फक्त ऐकल्या होत्या. आज प्रत्यक्षात मी अनुभवले. दुचाकी घेतलेल्या व्यक्तीने अशीच जीद्द कायम ठेवावी आणि भविष्यात चार चाकी खरेदी करावी असं त्यांनी म्हटलं आहे.

Video
Solapur Accident News : कंटेनर - दुचाकी अपघातात युवक ठार, एक गंभीर जखमी

तसेच मोहम्मद यांनी नाणी जमा करुन दुचाकी का खरेदी केली असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर मोहोम्मद यांनी देखील आपली कहाणी सांगितली आहे. ते म्हणाले की, बोरगाव येथे माझं स्वत:च एक छोटसं दुकान आहे. ही दुचाकी खरेदी करण्यासाठी मी गेल्या ५ ते ६ वर्षांपासून पैसे साठवत आहे असं त्याने म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com