India Corona Update: चिंता वाढली! कोरोना रुग्णांची धडकी भरवणारी आकडेवारी आली समोर, या 3 राज्यांनी घेतला मोठा निर्णय

India Corona Latest Update: देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तीन राज्यांनी मास्क सक्तीचा (Masks Compulsory) निर्णय घेतला आहे.
India Corona Latest Update
India Corona Latest Update SAAM TV

Delhi News: कोरोना व्हायरसने (Corona Virus) पुन्हा देशामध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने केंद्र सरकारची (Central Government) चिंता वाढवली आहे. देशातील सक्रीय कोरोना रुग्णांचा आकडा 31 हजार पार झाला आहे. वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता देशातील तीन राज्यांनी मास्क सक्तीचा (Masks Compulsory) निर्णय घेतला आहे.

India Corona Latest Update
Pm Narendra Modi New Look: काळी टोपी, खाकी रंगाची पँट आणि प्रिंटेड टी-शर्ट; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा न्यू लूक

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशामध्ये शनिवारी 6,155 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील सक्रीय कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ होत तो 31,194 वर पोहचला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाकडून आवश्यक पावलं उचलली जात आहेत.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हरियाणा, केरळ आणि पुडुचेरी या राज्यांमध्ये पुन्हा मास्कची सक्ती करण्यात आली आहे. हरियाणा सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले आहे. सरकारने जनतेला आवाहन केले आहे की, कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. हरियाणा सरकारने जिल्हा प्रशासनाला लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

India Corona Latest Update
Farmer Viral Video: शेतकऱ्याचा नादचं खुळा! गहू कापणीसाठी केला असा जबरदस्त जुगाड, मिनिटांमध्ये होईल काम, VIDEO तुफान VIRAL

केरळ सरकारने गर्भवती महिला, वयोवृद्ध नागरिक आणि रुग्णांना मास्कची सक्ती केली आहे. केरळचे आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी राज्यातील कोविड-19 च्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये त्यांनी राज्यात मास्क सक्तीचा निर्णय घेतला. त्यासोबत आरोग्य विभागाला ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देशही दिले. तसंच त्यांनी लवकरच खासगी रुग्णालयांची विशेष बैठक घेण्यात येणार असल्याचे देखील सांगितले.

तर दुसरीकडे, पुडुचेरी सरकारने मास्कची सक्ती केली आहे. या सरकारने देखील सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केला आहे. यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत प्रशासनाने सांगितले की, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, दारुची दुकानं, हॉस्पिटॅलिटी आणि मनोरंजन क्षेत्र, सरकारी कार्यालये आणि व्यावसायिक कार्यालयांध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क घालणे सक्तीचे असेल.

India Corona Latest Update
International News: होंडुरासमध्ये 20 पर्यटकांसह जहाज बुडालं, बचाव कार्य सुरू

दरम्यान, वाढत्या कोरोना प्रकरणावरुन केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी राज्यांच्या सर्व राज्यांचे आरोग्य मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व राज्यांना सतर्क राहण्यास सांगितले. तसंच उदयोन्मुख कोरोना हॉटस्पॉट ओळखण्यास आणि त्या भागात हॉस्पिटलची तयारी पूर्ण करण्यास सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील रुग्णालयांमधील सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी 10 आणि 11 एप्रिल रोजी मॉक ड्रिलची देखील घोषणा केली आहे.

Edited By - Priya Vijay More

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com