India Corona Update
India Corona UpdateSaam Tv

India Corona Virus Update: चिंता वाढली! देशात कोरोनाचा वेग वाढतच चाललाय, 24 तासांत 10,093 नव्या रुग्णांची नोंद

Corona Latest Update: कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांना काळजी घेण्याचे आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे.

News Delhi: देशामध्ये कोरोनाचा (Corona Virus) प्रसार वेगाने होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. देशभरतील अनेक राज्यात कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या वाढत चालली आहे. दररोज कोरोना रुग्णांचा चिंता वाढवणारा नवीन आकडा समोर येत आहे.

देशामध्ये गेल्या 24 तासांत 10,093 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सध्या सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. अशामध्ये कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांना काळजी घेण्याचे आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे.

India Corona Update
Appasaheb Dharmadhikari : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार; हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी भारतात 10,093 जणांना कोरोनाची लागण झाली. तर 23 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. शनिवारी आलेल्या आकडेवरीच्या तुलनेत रविवारी कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट झाली आहे. शनिवारी देशात 10,753 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर शुक्रवारी 11,109 रुग्ण आणि गुरुवारी एकूण 10,158 रुग्णांची नोंद झाली होती.

India Corona Update
Petrol Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पाहा तुमच्या शहरातील इंधनाचा दर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशामध्ये सध्या 57,542 सक्रीय रुग्ण आहेत. तर देशात गेल्या 24 तासांत 6,248 रुग्णांनी कोरोनावर मात केली. हा आकडा लक्षात घेता देशात आतापर्यंत 4,42,29,459 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत जवळपास 1,79,853 कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. सध्या देशामध्ये रिकव्हरी रेट 98.68 टक्के झाला आहे. रविवारी देशामध्ये 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशामध्ये मृत्यू दर 1.19 टक्के झाला आहे.

India Corona Update
Atiq Ahmed Last Words : हत्येपूर्वी काय होते गँगस्टर अतिक अहमदचे शेवटचे शब्द?

दरम्यान, महाराष्ट्रात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय कोविड प्रकरणांची संख्या 82 टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. 1 एप्रिल रोजी महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या 3,324 होती. परंतु शनिवारपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 6,047 वर पोहोचली. मुंबईत सक्रिय प्रकरणांमध्ये 67 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 1,021 वरून 1,702 वर पोहचली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com