karnataka Election : कर्नाटकच्या रणांगणात शरद पवार उतरले; राष्ट्रवादी लढणार इतक्या जागा; उमेदवारांची यादी जाहीर

karnataka Assembly Election : राष्ट्रवादी कर्नाटकात एकून किती जागांवर लढणार ती आकडेवारी आणि उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत.
Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV

NCP Contest : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.राष्ट्रवादी कर्नाटकात एकून किती जागांवर लढणार ती आकडेवारी आणि उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत. (Political News)

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी कर्नाटकात ९ जागा लढवणार आहे. उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत. उत्तम पाटील, मन्सूर बिलागी, जमीर इनामदार, कुलप्पा चव्हाण, हरी आर , आर शंकर माजी मंत्री, सुगुणा के., एस.वाय.एम.मसूद फौजदार, रेहाना बानो अशी उमेदवारांच्या नावांची यादी समोर आली आहे.

Sharad Pawar
Samruddhi Mahamarg Accident : भयावह! ट्रकखाली कार चिरडली अन्...; समृद्धी महामार्गावरील काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

कर्नाटक विधानसभा निवडणूक १० मे रोजी होणार असून १३ मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. तसेच २० एर्पिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. निवडणूक आयोगाने तेव्हा राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेसलाही धक्का देत राष्ट्रीय दर्जा काढून घेतला. त्यामुळे आता राष्ट्रवादी अॅक्टिव मोडमध्ये आली असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच राष्ट्रवादीच्या ९ उमेदवारांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Sharad Pawar
Gautami Sister : कसली भारी दिसते राव...; गौतमी की तिची बहिण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com