Anil Kumble On Ambati Rayudu: अंबाती रायुडूच्या निवृत्तीनंतर वातावरण तापलं! विराटला धारेवर धरत अनिल कुंबळेंनी केलं मोठं वक्तव्य

Anil Kumble: अंबाती रायुडूच्या निवृत्तीनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
anil kumble
anil kumble saam tv

Ambati Rayudu Retirement: आयपीएल २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी( २९ मे) पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरात टायटन्स संघाचा ५ धावांनी धूळ चारत जेतेपदाला गवसणी घातली आहे. या सामन्यात अंतिम चेंडूवर चौकार मारणारा रविंद्र जडेजा या सामन्याचा हिरो ठरला आहे.

तर ८ चेंडूंमध्ये १९ धावांची खेळी करणाऱ्या अंबाती रायुडूचा हा शेवटचा सामना ठरला. दरम्यान अंबाती रायुडूच्या निवृत्तीनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

anil kumble
WTC 2023 Final: IPL ची ट्रॉफी हुकली म्हणून काय झालं? रोहितकडे विराटला मागे सोडत इतिहास रचण्याची संधी..

आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०१९ स्पर्धेत भारतीय संघाला सेमी फायनलमधून बाहेर पडावं लागलं होतं. या स्पर्धेसाठी अंबाती रायुडूला भारतीय संघात स्थान मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र २ खेळाडू दुखापतग्रस्त होऊनही रायडूला संघात स्थान दिलं गेलं नव्हतं.

याबाबत बोलताना अनिल कुंबळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जिओ सिनेमावर याबाबत बोलताना अनिल कुंबळे यांनी म्हटलं की, 'रायुडूला २०१९ वर्ल्ड कपसाठी संधी मिळायला हवी होती. यात काहीच शंका नव्हती. ही एक मोठी चूक होती. कारण तुम्ही त्याला त्याच रोलसाठी तयार केलं होतं. त्यानंतर त्याला संधीच दिली नाही. (Latest sports updates)

anil kumble
CSK Trophy : देव पावला! IPL जिंकताच चेन्नईची ट्रॉफी पोहोचली तिरुपतीच्या चरणी -VIDEO

कुंबळेंनी विराट कोहली - रवी शास्त्रींवर साधला निशाणा?

भारतीय संघात विजय शंकरला स्थान दिलं गेलं होतं. त्यावेळी असं म्हटलं गेलं होतं की, विजय शंकर हा थ्री डी प्लेयर आहे. जो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करू शकतो. त्यांनतर विजय शंकर आणि शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर झाले होते.

तरीदेखील अंबाती रायुडूला संधी दली गेली नव्हती. त्याच्याऐवजी मयांक अगरवाल आणि रिषभ पंतला संघात स्थान दिलं गेलं होतं. त्यानंतर अंबाती रायुडूचं एक ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं होतं.

त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की,'आता वर्ल्ड कप पाहण्यासाठी थ्री डी गॉगल ऑर्डर केले आहेत..'या ट्विटद्वारे रायुडूने निवड समितीवर जोरदार टीका केली होती. त्यावेळी विराट कोहली हा भारतीय संघाचा कर्णधार होता. तर रवी शास्त्री हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.

विराटने सुचवला होता पर्याय...

वनडे वर्ल्ड कप २०१९ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी विराट कोहलीने,अंबाती रायुडू हा चौथ्या क्रमांकासाठी पर्याय असल्याचे म्हटले होते. असं असताना देखील त्याने अंबाती रायडूला भारतीय संघात स्थान दिलं गेलं नव्हतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com