
Asia Cup 2023 India vs Pakistan Match: आशिया कप २०२३ स्पर्धेतील सुपर-४ फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या ६ संघांपैकी अफगाणिस्तान आणि नेपाळ हे दोन संघ साखळी सामन्यातच बाहेर पडले आहेत. तर भारत, पाकिस्तानसह श्रीलंका आणि बांगलादेशने सुपर-४ फेरीत प्रवेश केला आहे. येत्या रविवारी म्हणजेच १० सप्टेंबरला भारतीय संघाचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. (Latest Marathi News)
मात्र, या सामन्यापूर्वीच क्रिडाप्रेमींचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. श्रीलंकेच्या कोलंबोत पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे हा सामना पहिल्या सामन्याप्रमाणे रद्द होतो की काय? अशी चिंता अनेकांना लागली आहे.
सुपर-४ फेरीतील तब्बल ५ सामने श्रीलंकेतील कोलंबोत होणार आहे. त्यामुळे हे सामने जर पावसामुळे रद्द झाल्यास कोणते दोन संघ फायनलमध्ये पोहचतील? असा प्रश्न क्रिडाप्रेमींना पडला आहे. पाकिस्तानने बांग्लादेशविरोधात सुपर-४ फेरीतील पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात दोन गुण जमा झाले आहेत.
अजूनही पाकिस्तानचे दोन सामने बाकी असून त्यांना टीम इंडिया आणि श्रीलंकेसोबत खेळायचे आहे. पण हे दोन्ही सामने रद्द झाल्यास पाकिस्तान डायरेक्ट फायनलमध्ये पोहचेल कारण, त्यांना या दोन्ही सामन्यात १-१ गुण मिळेल, म्हणजेच ४ गुणांच्या जोरावर ते फायनलमध्ये प्रवेश करतील.
दुसरीकडे पहिला सामना गमावल्यानंतर बांग्लादेशच्या खात्यात एकही गुण जमा झाला नाही. उलट त्यांचा नेट रनरेट खूपच कमी झाला आहे. त्यामुळे उर्वरित सामने रद्द झाल्यावर बांग्लादेशचे आशिया कप 2023 मधील आव्हान संपुष्टात येईल. तर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांना फायनलमध्ये पोहचण्याची संधी असेल.
दोन्ही संघांचे सुपर-४ फेरीतील ३-३ सामने बाकी असून हे सामने रद्द झाल्यास त्यांना ३-३ गुण दिले जाईल. अशा परिस्थितीत टॉस उडवून अंतिम फेरीत कोणता संघ प्रवेश करणार याचा निर्णय घेतला जाईल. कारण सामनेच न खेळल्याने रनरेटवचाही विचार करता येणार नाही. असं झालंच तर भारतीय संघ आशिया कप २०२३ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणार की नाही? हे फक्त नशीबावर अवलंबून असेल.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.