
How Can Mumbai Indians Qualify For Playoffs 2023: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल २०२३ स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्येक संघांचे एक किंवा दोनच साखळी सामने बाकी असून प्लेऑफची फेरी गाठण्यासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये चेन्नई सुपरकिंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सचा समावेश आहे. (Latest sports updates)
हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने यापूर्वीच प्लेऑफच्या फेरीत आपलं स्थान पक्कं केलं आहे. याशिवाय, दिल्ली कॅपिटल्स, सनराईजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज या संघांसाठी प्लेऑफचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत.
दरम्यान, पाचवेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात प्लेऑफची (Playoffs 2023) फेरी गाठण्यासाठी धडपडत आहे. मात्र, मुंबईच्या हातातून सध्या वेळ निघून गेली असून त्यांना प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी दुसऱ्या संघांवर आधारभूत राहावं लागतंय.
गुरूवारी (१८ मे) आयपीएलमध्ये आरसीबी आणि हैदराबाद (SRH) या दोन संघात सामना झाला. प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या सामन्यात आरसीबीने हैदराबादच्या संघावर दणदणीत विजय साकारला. या विजयासह त्यांनी आपले प्ले ऑफमधील स्थान मिळवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. पण या विजयानंतर आता मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.
कोहलीच्या शतकामुळेच आरसीबीला (RCB) विजय मिळवता आला आणि त्याने रोहित शर्माला पुन्हा एकदा चिंतेत टाकले.या सामन्यापूर्वी आरसीबीच्या संघाने १२ सामने खेळले होते. या १२ सामन्यांमध्ये त्यांनी ६ विजय मिळवले होते, तर ६ सामन्यांमध्ये ते पराभूत झाले होते. त्यामुळे ६ सामन्यांतील विजयासह त्यांनी १२ गुण कमावले होते. त्यामुळे आरसीबीचा संघ हा पाचव्या स्थानावर होता.
हैदराबादचा सामना आरसीबीने जिंकला आणि त्यांनी दोन गुण मिळवले. त्यामुळे आता आरसीबीचे १४ गुण झाले आहेत. गुणतालिकेत मुंबईचा संघ हा चौथ्या स्थानावर होता आणि त्यांचेही १४ गुण आहेत. पण या दोघांमध्ये फरक आहे तो फक्त रनरेटचा. मुंबईचा रनरेट हा आरसीबीपेक्षा कमी आहे आणि याचा फायदा आरसीबीला झाला आहे.
कारण गुण समान असले तरी रनरेटच्या जोरावर त्यांनी चौथे स्थान पटकावले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. मुंबईचा संघ हा टॉप-४ मधून बाहेर पडला आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी अव्वल चार संघ पाहिले जातात आणि आरसीबी आता अव्वल चारमध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे मुंबई मात्र अव्वल चार संघांमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे मुंबईसाठी ही धोक्याची घंटा आहे.
दरम्यान, आरसीबीने आजचा सामना जिंकला असला तरी, मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून (Cricket News) पूर्णपणे बाहेर पडला नाही. मुंबईचा अजूनही एक सामना बाकी आहे. तो हैदराबादविरुद्ध घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडेवर होणार आहे. या सामन्यात मुंबईने जर मोठ्या फरकाने विजय मिळवला तर ते प्लेऑफची फेरी गाठू शकतील.
चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) आणि लखनौ सुपर जायंट्सचे १३ सामन्यात प्रत्येकी १५ गुण आहेत. दोन्ही संघांचा नेटरनरेटही चांगला आहे. उद्या चेन्नईचा सामना दिल्लीसोबत आणि लखनौचा सामना कोलकातासोबत होणार आहे. या सामन्यांमध्ये लखनौ किंवा चेन्नई यांच्यापैकी कोणताही संघ पराभूत झाला तरी मुंबईचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. मात्र, त्यासाठी मुंबईला पुढचा सामना जिंकावा लागेल.
याशिवाय आरसीबीचा अजून एक साखळी सामना बाकी आहे. तो यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2020) सर्वात बलाढ्य मानल्या जाणाऱ्या गुजरात टायटन्ससोबत होणार आहे. जर गुजरातने आरसीबीला या सामन्यात पराभूत केलं तर आरसीबीचा संघ केवळ १४ गुणांवरच राहिल.
अशातच मुंबईने पुढच्या सामन्यात विजय मिळवला तर त्यांना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. एकंदरीत गणित बघता मुंबईच्या संघाला सध्या दुसऱ्या संघाच्या विजयावर अवलंबून राहावं लागणार आहे. जर-तरच्या या गणितात जर एखांदा उलटफेर झाला, तर मुंबईचा संघ नक्कीच प्लेऑफची फेरी गाठू शकतो.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.